Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार

विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार

cm devendra fadnavisमुंबई, [१७ जुलै] – नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या अमानुष हत्येनंतर गृहमंत्री किंवा राज्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट न देऊन अनास्था दाखविल्याचा आरोप करत, आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रविवारी एका संयुक्त पत्रपरिषदेत केली. सोमवारपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. धनंजय मुंडे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, कपिल पाटील, गणपतराव देशमुख, अबु आझमी, अजित पवार जोगेंद्र कवाडे आदींचा यात समावेश होता. त्यानंतर विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्तपणे पत्रपरिषद घेतली.
युती सरकारच्या काळात एक वर्षात चार हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. बी-बियाण्यांना पैसे नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविल्या. दुष्काळात दिलासा मिळेल ही अपेक्षा शेतकर्‍यांनी सोडून दिली आहे. मंत्र्यांच्या घोटाळ्यानंतरही त्यांना क्लीन चीट मिळते. न्यायालयाने ताशेरे ओढूनही कारवाई होत नाही. सरकार गरीब शेतकरी, शेतमजूर कष्टकर्‍यांचे नाही. शेतकर्‍यांबद्दल अनास्था आणि व्यापार्‍यांबद्दल आस्था दिसते, असे विखे पाटील म्हणाले.
निर्भया प्रकरणानंतर बलात्कारातील गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून कायदा अधिक कडक करण्यात आला. पण, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व नंतर तिची झालेली निर्घृण हत्या पाहता या राज्यात कायद्याचा धाक राहिला आहे, असे वाटत नाही. इतकी भयंकर घटना घडूनही दोन दिवस गुन्हा दाखल होत नाही. गृहमंत्री, गृहराज्यमंत्री कोणीही तेथे फिरकत नाहीत. पालकमंत्री राम शिंदे जातात. त्यांचे स्वत:चे या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष भवाळ याच्या फेसबूक अकाऊंटवर त्याच्यासोबत छायाचित्र आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत सरकारची अनास्था दिसून येते, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. या प्रकरणाचा खटला शीघ्रगती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29147

Posted by on Jul 18 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (138 of 2451 articles)


=धर्मगुरू कल्बे सादिक यांचे आवाहन= लखनौ, [१७ जुलै] - मुस्लिम युवकांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श घ्यावा, असे ...

×