Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विशाल सिक्का पंतप्रधानांना भेटले

विशाल सिक्का पंतप्रधानांना भेटले

=१५०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली=
infosysनवी दिल्ली, [१४ जानेवारी] – आयटी क्षेत्रात संपूर्ण जगभरात आघाडीवर असलेल्या इन्फोसिस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि कंपनी सॉफ्टवेअर व सेवा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामांसाठी १५०० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती दिली.
भारतातील दुसर्‍या क्रमाकांची आयटी कंपनीचे सीईओ सिक्का यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली. स्मार्ट आणि डिजिटल सक्षम भारताचे जे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कंपनी कशाप्रकारे सहकार्य करू शकते याबाबतही उभयतांमध्ये यावेळी चर्चा झाली. मध्यप्रदेशच्या उज्जैन येथे २०१६ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी इन्फोसिस एक सॉफ्टवेअर विकसित करीत आहे, अशी माहिती सिक्का यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
इन्फोसिसचा म्हैसूर येथील परिसर स्मार्ट सिटीचे देशातील पहिले मॉडेल म्हणून येत्या एप्रिल महिन्यात समर्पित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे, असे इन्फोसिसचे पहिले गैरसंस्थापक सीईओ असलेल्या सिक्का यांनी सांगितले. स्मार्ट सिटीज, स्मार्फ इन्फ्रास्ट्रक्चर व नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यात पंतप्रधान मोदींना खूप रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातही आम्ही सहकार्य करू शकतो. आम्ही गेल्याच आठवड्यात ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा इनोव्हेशन फंड स्थापन केला आहे. यापैकी अर्धा निधी म्हणजे सुमारे १५०० कोटी रुपये भारतातील इनोव्हेशनसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19708

Posted by on Jan 15 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2236 of 2453 articles)


=शीला दीक्षित-अजय माकन यांच्यात जुंपली= नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच कॉंग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून ...

×