Home » क्रीडा, ठळक बातम्या » विश्‍वचषक फुटबॉलचे थाटात उद्घाटन

विश्‍वचषक फुटबॉलचे थाटात उद्घाटन

साओ पाउलो, [१३ जून] – जगातील फुटबॉलचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या तसेच क्रीडा विश्‍वातील सर्वात मोठा थरार असलेल्या फुटबॉलच्या विश्‍वचषक स्पर्धेचे गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री येथे एका शानदार समारंभात उद्घाटन झाले. ब्राझीलच्या प्राचीन संस्कृती व संगीताचे बहुतांश प्रमाणात दर्शन घडविणार्‍या या समारंभाचा प्रत्यक्ष मैदानावर बसून हजारो फुटबॉलप्रेमींनी, तर दूरदर्शनच्या माध्यमातून करोडो चाहत्यांनी आनंद लुटला.
या उद्घाटनांनंतर आता महिनाभर चालणार्‍या फुटबॉलच्या थरारचाही अनुभव चाहत्यांना घेता येणार आहे. सुमारे ६४ वर्षांच्या कालावधीनंतर यजमानपद मिळाल्यामुळे ब्राझीलसाठी १२ जूनचा दिवस ऐतिहासिक ठरला. पर्यावरणाबाबत आम्ही किती जागरूक आहोत, याची जणू एक झलकच या रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलने दाखविली. पॉप सुपरस्टार क्लाऊडिया लिट्टे, जेनिफर लोपेज व पिटबुल यांनी यावेळी सादर केलेल्या स्पर्धेचे थीम सॉंग असलेल्या ‘ओले ओला’ (आम्ही सगळे एक आहोत) या गाण्यावर शेकडो कलावंतांसह मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनीही ताल धरला होता. ड्रमर आणि जिम्नॅस्ट यांनी सादर
केलेल्या कौशल्यामुळे हे नृत्य आणखीच आकर्षक झाले होते. अर्थातच याही कार्यक्रमात सांबा नृत्याने धूम उडवून दिली. साओ पाउलोच्या कोरिंथियन्स एरेना या मैदानावर उपस्थित सुमारे ६० हजार प्रेक्षकांनी भारतीय वेळेनुसार रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेला हा या सोहळा डोळ्यात साठवून घेतला. ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या आयर्न मॅनने चेंडूला पहिली किक मारून यंदाच्या या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा किक ऑफ केला. ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डो जेव्हा ब्राझीलची प्रसिद्ध मॉडेल फर्नांडा लिमा हिच्यासोबत फुटबॉलच्या विश्‍वचषकाची प्रतिकृती घेऊन मैदानात आला तो क्षण उपस्थिताना भावुक करून गेला. ब्राझीलने आतापर्यंत पाचवेळा ही स्पर्धा जिंकली असून यंदाही त्यांना विजयाचा विश्‍वास आहे, हे जणू यावेळी दाखविण्यात आले. ब्राझीलमधील मार्शल आर्टस्‌चेही प्रदर्शन यावेळी करण्यात आले.
सामान्य जनतेला मिळणार्‍या सुविधा आणि गरिबी यामुळे स्थानिक लोकांमध्ये आक्रोश असताना या स्पर्धांचे यशस्वी आयोजन हे सरकार आणि आयोजकांसमोरील एक मोठे आव्हान आहे. असे असले तरी ब्राझील या देशाची ओळख उत्सव आणि शानदार समारंभांचे उत्कृष्ट आयोजक म्हणून असल्यामुळे त्याची झलक आज विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभातही पाहायला मिळाली. या स्पर्धेमुळे कदाचित ब्राझीलची विस्कळीत झालेली आर्थिक घडी व्यवस्थित व्हायला मदत होईल, याही विचाराचे काही लोक या देशात आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13600

Posted by on Jun 13 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2418 of 2455 articles)


नवी दिल्ली, [११ जून] - देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे देशातील अन्य पाच विभागात थ्रीजी सेवेचा विस्तार करण्यात ...

×