Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » विश्‍वासू देशांमध्ये भारत दुसरा

विश्‍वासू देशांमध्ये भारत दुसरा

=मोदी इफेक्ट…, संयुक्त अरब अमिरात पहिल्या स्थानावर=
narendra-modi-4डाव्होस, [२१ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताची सत्ता येताच जागतिक पातळीवर भारताला मानाचे स्थान मिळत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जगातील विश्‍वासू व जबाबदार देशांच्या यादीत भारताने दुसर्‍या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
एका सर्वेक्षणातून ही माहिती बाहेर आली आहे. ‘स्विस रिसॉर्ट’ या संस्थेने याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. विश्‍वासू आणि जबाबदार देशांकरिता घेण्यात आलेल्या मतदानात भारताला १०० पैकी ७९ गुण मिळाले आहेत. मागील वर्षी या जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर होता. आता भारताने दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे.
स्विस रिसॉर्टने या वर्षाकरिता जगातील सर्वात विश्‍वासू व जबाबदार असणार्‍या २७ देशांचे सर्वेक्षण केले आहे. संयुक्त अरब अमिरात विश्‍वासू देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे तर, भारतापाठोपाठ चीन व नेदरलॅण्ड अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर जपान, रशिया, हॉंगकॉंग, दक्षिण आफ्रिका, इटली, ब्राझील, मलेशिया, फ्रान्स आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात त्या देशातील सरकार, व्यवसाय, प्रसारमाध्यमे व सामाजिक संस्थांचा अभ्यास करण्यात आला.
विशेष म्हणजे, या अहवालाच्या पहिल्या पानावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारतात मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून जागतिक पातळीवर देशाचे स्थान उंचावले आहे. जगाच्या पाठीवरील इतर देश भारताकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19888

Posted by on Jan 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2198 of 2458 articles)


=हजारावर अर्ज दाखल= नवी दिल्ली, [२१ जानेवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज बुधवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या ...

×