Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विश्‍वास ठेवा, ‘अच्छे दिन’ येणारच!

विश्‍वास ठेवा, ‘अच्छे दिन’ येणारच!

=नरेंद्र मोदींच्या क्षमतेवर रतन टाटांचा विश्‍वास=
Ratan Tataमुंबई, [१८ एप्रिल] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ज्या चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखविले आहे, ते ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील. मोदी यांच्यावर विश्‍वास ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा… हताश होऊ नका… वचनांची पूर्तता ते नक्कीच करतील, अशा शब्दात प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे.
मुंबई इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस बोकोनीच्या दीक्षांत समारंभात बोलताना त्यांनी देशवासीयांना आणि उद्योग जगताला मोदी सरकारविषयी आश्‍वस्त राहाण्याचा सल्ला दिला. अलीकडेच एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, मॅरिको समूहाचे अध्यक्ष हर्ष मारिवाला आणि सीआयआयचे अध्यक्ष सुमित मजुमदार यांनी मोदी सरकारच्या धोरणांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत, मोदी सरकारची चमक उडत चालली असल्याचा सूर काढला होता. याच पार्श्‍वभूमीवर रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर विश्‍वास ठेवा, असे उद्योग जगताला सांगितले आहे.
केंद्रात सत्तेवर येऊन मोदी सरकारला अजून एक वर्षही झालेले नाही. त्यामुळे इतक्या लवकर निराश होण्याचे काहीच कारण नाही. या सरकारला आपण पुरेसा वेळ द्यायलाच हवा. मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाकडून सर्वांनाच फार अपेक्षा आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे त्यांचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे आणि ते साकारण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली आहेत. हे सर्व घडून यायला थोडा वेळ लागणारच आहे. अगदी लगेचच नवनिर्माण होईल, बदल घडतील, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. मोदी यांनी जे स्वप्न दाखविले आहे, त्याला पाठिंबा द्यायला हवा. देशाला पुढे नेण्यासाठी त्यांनी योग्य दिशेने पाऊल उचलले आहे. दिलेल्या वचनांची पूर्तता ते नक्कीच करतील, असा मला विश्‍वास आहे. तुम्हीही मोदी यांच्या पाठीशी उभे राहा, असे रतन टाटा यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारताची वाटचाल सध्या इतिहासाच्या अतिशय महत्त्वपूर्ण काळातून सुरू आहे. येथून पुढे आपली गाठ वास्तवाशी पडणार आहे. त्यात तुम्हाला अनेक चांगल्या संधीही उपलब्ध होणार आहेत, असा आशेचा किरण यावेळी रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांना दाखवला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22187

Posted by on Apr 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1766 of 2453 articles)


=राज्य सरकारचा निर्णय= मुंबई, [१८ एप्रिल] - मंत्री किंवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर गेल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांकडून मानवंदना देण्याची ...

×