Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला एनजीटीची मंजुरी

विश्‍व सांस्कृतिक महोत्सवाला एनजीटीची मंजुरी

=पाच कोटींचा दंडही ठोठावला=
WorldCultureFestival2016नवी दिल्ली, [९ मार्च] – यमुना नदीच्या किनार्‍यावर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यातर्फे आयोजित विश्‍व सांस्कृतिक महोत्सवास राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) मंजुरी प्रदान केली असली, तरी पर्यावरणाचे होणार्‍या नुकसानीबद्दल पाच कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
संवैधानिक जबाबदारी पार न पाडल्याबद्दल दिल्ली विकास प्रशासन (डीडीए) आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला अनुक्रमे पाच लाख व एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तीन दिवसांसाठी या महोत्सवासाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगने एनजीटीला सांगितले आहे.
परवानगी नाही : जलस्रोत मंत्रालय
दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादापुढे आपली भूमिका स्पष्ट करताना, श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला आम्ही कुठलीही परवानगी दिली नसल्याचे जलस्रोत मंत्रालयाने सांगितले. तर, वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तात्पुरत्या व्यासपीठाच्या बांधकामाकरिता आमच्या मंजुरीची कुठलीही आवश्यकता नसल्याची भूमिका विशद केली.
तर चेंगराचेंगरीची शक्यता : पोलिस
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यातर्फे आयोजित जागतिक सांस्कृतिक महोत्सवाच्या ठिकाणी असलेल्या त्रुटी व उणिवा तातडीने दूर करण्यात आल्या नाही, तर चेंगराचेंगरी होण्याची किंवा प्रचंड गोंधळाची स्थिती उद्‌भवण्याची शक्यता जास्त असल्याचा अहवाल दिल्ली पोलिसांनी दिला आहे.
यमुना नदीच्या तिरावर हा महोत्सव येत्या ११ ते १३ मार्च या काळात आयोजित करण्यात आला आहे. १ मार्च रोजी पोलिसांनी कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी केली असता, काही गंभीर उणिवा आढळून आल्या होत्या. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य महत्त्वपूर्ण व्यक्ती विराजमान होणार असलेले व्यासपीठ उभारण्याबाबत गंभीर त्रुटी दिसून आल्या आहेत. आम्ही या त्रुटींची कल्पना केंद्रीय नगर विकास मंत्रालयाला पत्राद्वारे दिली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे व्यासपीठ ज्या पद्धतीने बांधण्यात येत आहे, ते कोसळण्याचीच शक्यता जास्त असल्याने कार्यक्रमस्थळी प्रचंड गोंधळ किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्‍न उपस्थित होणार आहे, असेही या पत्रात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27156

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (721 of 2453 articles)


आग्रा, [९ मार्च] - अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हिंदू मुलीची सुटका करणार्‍या १५ वर्षीय नाझिया या मुस्लिम मुलीचा उत्तर प्रदेश सरकारने राणी ...

×