Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विहिंप बांधून देणार नेपाळमधील घरे, मंदिरे

विहिंप बांधून देणार नेपाळमधील घरे, मंदिरे

=प्रवीण तोगडिया यांची माहिती=
PRAVEEN_TOGADIAअलाहाबाद, [२८ एप्रिल] – महाविनाशी भूकंपात उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळमधील घरे, मंदिरे आणि अन्य श्रद्धास्थळे पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मदत करण्याचा निर्णय विश्‍व हिंदू परिषदेने घेतला आहे.
नेपाळच्या भूकंपात अनाथ झालेल्या बालकांना भारतात आणून त्यांना चांगले शिक्षण देण्यासोबतच त्यांना देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठीही विहिंप प्रयत्न करणार आहे. या मुलांच्या राहण्याचीही मोफत व्यवस्था केली जाईल, अशी माहिती विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तागडिया यांनी एका निवेदनातून दिली.
विहिंपच्या देशात सुमारे दीडशे निवासी शाळा आणि ५० अनाथाश्रम आहेत. भूकंपात आई-वडील गमावलेल्या मुलांना येथे आम्ही आश्रय देऊ आणि त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू, असे तोगडिया यांनी यात म्हटले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या नैसर्गिक संकटात हजारो मुले अनाथ झाली आहेत. त्यांनाही आम्ही याच निवासी शाळा आणि आश्रमांमध्ये आश्रय दिला आहे. आज ते चांगले जीवन जगत आहेत. आम्ही केवळ अनाथ बालकांचीच काळजी घेणार आहोत, असे नाही तर नेपाळमधील उद्‌ध्वस्ते घरे, मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीतही आवश्यक ते सहकार्य करणार आहोत. याशिवाय, या भीषण दु:खातून नागरिकांना बाहेर येता यावे, यासाठीही प्रयत्न करणार आहोत, असे सांगताना तोगडिया यांनी विहिंपच्या या सामाजिक कार्यात मदत करण्यासाठी देशातील उद्योगपतींनी समोर यावे, असे आवाहन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22385

Posted by on Apr 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1732 of 2453 articles)


=भारतातील भूकंपाचा आढावा= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] - नेपाळ आणि उत्तर भारतात सतत दोन दिवस बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये झालेल्या प्राण ...

×