Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » वि.प. सभापति निवडणूक; चौघांची उमेदवारी दाखल

वि.प. सभापति निवडणूक; चौघांची उमेदवारी दाखल

=कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अपक्ष आमदार मैदानात=
maharashtra-vidhansabha mumbaiमुंबई, [१९ मार्च] – अविश्‍वास ठराव मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी शुक्रवार, २० रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत गुरुवारी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, यात अपक्ष आमदाराचा देखील समावेश आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या या निवडणुकीत अधिक रंगत निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसकडून विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेकडून नीलम गोर्‍हे आणि अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शुक्रवारी सभागृहात आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याची शक्यता आहे. परंतु सभागृहातील एकूण सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २८, कॉंग्रेस २१, भाजपा १२, शिवसेना ७ आणि अपक्ष ७ अशी सदस्य संख्या आहे. परंतु भाजपाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असून, अपक्ष उमेदवारला शिवसेनेचे नेते आणि मंत्री डॉ. दीपक सावंत आणि दत्तात्रेय सावंत यांनी अनुमोदन दिल्याने, शिवसेना अपक्षाला पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तर, कॉंग्रेस आपला उमेदवार परत घेऊन, अपक्षाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21606

Posted by on Mar 20 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1869 of 2451 articles)


=देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत= बीजिंग, [१९ मार्च] - एका चिनी कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत ...

×