वीरभद्र सिंह, अब्दुल्लांना बंगला सोडण्याचे आदेश
Sunday, September 27th, 2015=इस्टेट महासंचालनालयाने बजावली नोटीस=
नवी दिल्ली, [२६ सप्टेंबर] – सीबीआयच्या कचाट्यात अडकलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला आणि कॉंगे्रसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या पत्नी सरोज कुमारी यांना दिल्लीतील शासकीय बंगले रिकामे करण्याचे आदेश देणारी नोटीस कॅबिनेटच्या निवास समितीने जारी केली आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतल्यानंतर कॅबिनेट समितीने वीरभद्र यांच्या शासकीय निवासस्थानांचे वाटप गेल्या एप्रिलमध्येच रद्द ठरविले होते. पण, त्यांनी बंगला रिकामा केला नव्हता. उलट, त्यांनी इस्टेट संचालनालयाला पत्र लिहिले आणि हा बंगला माझ्याकडेच कायम ठेवण्यात यावा, अशी विनंती केली. सिंह बंगला रिकामा करीत नसल्याने अखेर महासंचालनालयाने त्यांना रीतसर नोटीस जारी केली.
संचालनालयाने काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला आणि सरोज कुमारी यांनाही शासकीय निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस अलीकडेच जारी केली आहे. अर्जुनसिंह यांचे २०११ मध्ये निधन झाल्यानंतर तत्कालीन संपुआ सरकारने सरोज कुमारी यांना २०१६ पर्यंत या बंगल्यात वास्तव्य करण्याची परवानगी दिली होती. पण, रालोआ सरकारने त्यांना झालेले बंगल्याचे वाटप रद्द ठरविले आहे. गेल्या वर्षी संपुआ सरकारचे पतन झाल्यानंतर अब्दुल्ला यांचेदेखील शासकीय बंगल्यात वास्तव्य कायमच आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=24062

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!