Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » वृक्ष लागवडीतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार

वृक्ष लागवडीतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार

sudhir-mungantiwar1मुंबई, [१५ जून] – वृक्ष लागवडीसाठी राज्यात सकारात्मक वातावरण तयार झाले असून या ऊर्जेतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कृषी दिन तसेच वन महोत्सवाचे औचित्य साधून वन विभागाने राज्यात २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. वन विभागासह शासनाचे २२ विविध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक आणि स्वंयसेवी संस्था तसेच लोकसहभागातून वृक्ष लागवडीचे काम राज्यात केले जाणार आहे. या पृष्ठभूमीवर काल वनमंत्री मुनगंटीवार यांनी आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणस्नेही पृथ्वी आपल्याला पुढच्या पिढीच्या हाती सोपवायची आहे. त्यामुळे हरित आणि सुंदर महाराष्ट्र निर्मितीच्या वन विभागाच्या ध्येयात आपण सर्वांनी सहभागी होऊन आपले योगदान द्यावे. वृक्ष लागवड आणि पाण्याचा किंवा पावसाचा जवळचा संबंध आहे. जिथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे तिथे पडणार्‍या पावसाचे प्रमाण अधिक आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यावर्षीच्या दोन कोटी वृक्ष लागवडीनंतर पुढील वर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आणखी जोमाने हाती घेतला जाणार आहे. त्यात इतर जागांप्रमाणेच राज्यातील टेकड्या आणि डोंगरावरही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होईल.
वृक्ष जगवण्याचाही वन विभागाचा संकल्प आहे. लावलेले वृक्ष जगतील यादृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगतांना वनमंत्री मुनगंटीवार यांनी २०१९ पर्यंत महाराष्ट्र हिरवागार करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. तसेच या ध्येयप्राप्तीसाठी यात सर्व सहभागी संस्था, व्यक्ती, उद्योगसमूह आणि मान्यवरांच्या दर तीन महिन्याला बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जाईल व एका लोकचळवळीतून या संकल्पपूर्तीच्या दिशेने वाटचाल केली जाईल, असेही ते म्हणाले.
राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात १ जुलै २०१६ रोजी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. गावपातळीवरील कार्यक्रमाची अंमलबजावणी सुनियोजित व्हावी यासाठी २१ जून २०१६ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत ग्रामविकास विभागाने१४ जून २०१६ रोजीच्या पत्रान्वये सर्व ग्रामपंचायतींना कळविले आहे. या कामात वन विभागाशिवाय शासनाचे इतर २२ विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग समूह, स्वयंसेवी-सामाजिक संस्था, मान्यवर व्यक्ती देखील सहभागी होणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28615

Posted by on Jun 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (230 of 2451 articles)


=केंद्रीय कर्मचार्‍यांना खुशखबर= नवी दिल्ली, [१५ जून] - केंद्र सरकारच्या विद्यमान ४७ लाख कर्मचार्‍यांसाठी आणि सुमारे ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी ...

×