Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » वेतन आयोगाचा भार कमी करा

वेतन आयोगाचा भार कमी करा

=सुरेश प्रभूंनी अर्थ मंत्रालयाकडे मागितले ३२ हजार कोटी=
suresh-prabhuनवी दिल्ली, [१ जानेवारी] – सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आधीच आर्थिक समस्येत असलेल्या रेल्वेवर पडणारा भार कमी करण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज शुक्रवारी अर्थ मंत्रालयाकडे ३२ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे.
याबाबतचे पत्र प्रभू यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी रेल्वेची आर्थिक स्थिती, खर्च कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि महसुलातील तूट कमी करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले याविषयीची माहिती अर्थमंत्र्यांना दिली. सोबतच, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येणार असल्यामुळे रेल्वेवर फार मोठा आर्थिक भूर्दंड बसणार असल्याने, प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांना यामुळे खिळ बसू शकते, याकडेही प्रभू यांनी अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधले.
वेतन आयोग लागू झाल्यानंतर रेल्वेची आर्थिक स्थिती आणखी बिघडेल. यातून रेल्वेला बाहेर काढण्यासाठी अर्थ मंत्रालयाने ३२ हजार कोटी रुपयांचे तातडीचे अनुदान मंजूर करावे, अशी माझी नम्र विनंती असल्याचे प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26354

Posted by on Jan 2 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (958 of 2453 articles)


नवी दिल्ली, [३१ डिसेंबर] - संपूर्ण देश नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला असतानाच केंद्राने पूर्वसंध्येला पेट्रोल ६३ पैसे आणि डिझेल ...

×