Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » वैयक्तिक, औद्योगिक कर कमी करणार: अरुण जेटली

वैयक्तिक, औद्योगिक कर कमी करणार: अरुण जेटली

Arun Jaitley3न्यूयॉर्क, [७ ऑक्टोबर] – येत्या काळात वैयक्तिक कराचे प्रमाण कमी करून योग्य स्तरावर आणण्यात येतील. तसेच येत्या चार वर्षांत औद्योगिक कर २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येईल, असे आश्‍वासन अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे.
पुढच्या आर्थिक वर्षापासून याला सुरुवात होईल. या वेळी करसवलतींना कात्री लावण्याचे संकेत देतानाच वैयक्तिक बचतीला प्रोत्साहन देणार्‍या सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
कोलंबिया युनिव्हर्सिटीत दिलेल्या व्याख्यानात त्यांनी हे आश्‍वासन दिले. योग्य कर आकारणीबरोबरच अधिकाधिक बँकिंग व्यवहार आणि विशिष्ट मर्यादेनंतर होणार्‍या खर्चासाठी पॅन कार्ड सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे, जेणेकरून काळ्या पैशाविरोधातील लढ्याला दीर्घकालीन बळ मिळू शकेल, असेही जेटली या वेळी म्हणाले. औद्योगिक कर कमी झाल्यावर सध्या मिळणार्‍या करसवलती टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. येत्या काळात सरकारसाठी वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी ही सर्वांत मोठी प्राथमिकता आहे, तसेच हिवाळी अधिवेशनात बँक्रप्सी कोड सादर करण्याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
काळ्या पैशाची समस्या निकालात काढण्यासाठी कराचे प्रमाण योग्य पातळीवर आणणे आवश्यक आहे. जेणेकरून लोक अगत्याने कर भरणे सुरू करतील, असे त्यांनी सांगितले. करसवलती कमी करण्याचे संकेत देतानाच वैयक्तिक बचतीला प्रोत्साहन देणार्‍या सवलतींना हात लावण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या चार आर्थिक वर्षांमध्ये औद्योगिक कर २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येईल. यावर मिळणार्‍या सवलती टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येतील. या वर्षातच या सवलतींबाबत सूचित करण्यात येईल, असेही जेटली यांनी नमूद केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25037

Posted by on Oct 8 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1364 of 2458 articles)


स्टॉकहोम, [७ ऑक्टोबर] - डीएनएमधील दुरुस्तीबद्दल स्वीडनचे टॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉडरिच आणि अमेरिकन वंशाचे तुर्कीचे वैज्ञानिक अजीझ सँकार या ...

×