Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदर कपातीसाठी हीच योग्य वेळ : पनगारिया

व्याजदर कपातीसाठी हीच योग्य वेळ : पनगारिया

Arvind-Panagariya1नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अर्धा ते एक टक्का कपात करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी गुरुवारी व्यक्त केले.
देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे आणि अजूनही तीन तिमाही शिल्लक असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त राहील, असा आशावादही पनगारिया यांनी व्यक्त केला आहे.
आरबीआयने व्याजदरात अर्धा ते एक टक्का कपात करण्याची गरज आहे आणि हे करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असेही ते म्हणाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविण्याच्या निर्णयाचा आरबीआयवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता, अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात खूप वाढ करण्याची शक्यता नसल्याने, अशा स्थितीत आरबीआयवर त्याचा फारसा परिणाम होईल असे वाटत नाही, असे पनगारिया यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23760

Posted by on Sep 11 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1487 of 2453 articles)


[gallery ids="23758,23757,23756"] मुंबई, [१० सप्टेंबर] - जपानच्या कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

×