Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदर जैसे थे!

व्याजदर जैसे थे!

  • गृह व वाहन कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली
  • आरबीआयने जाहीर केला पतधोरणाचा आढावा

RBI GATEमुंबई, [३ फेब्रुवारी] – बाजारपेठ आणि उद्योग क्षेत्राने केलेल्या निराश कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने आज मंगळवारी सर्वच प्रमुख कर्जांवरील व्याजाचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. १५ दिवसांपूर्वीच व्याजाचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले असल्याने पुन्हा त्यात कपात करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.
रघुराम राजन यांनी मंगळवारी द्विमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर केला. यावेळी त्यांनी अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजाचे दर ७.७५ टक्के याच स्तरावर कायम ठेवताना स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशोच्या (एसएलआर) दरात ५० बेसिस अंकांनी अर्थातच अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. यामुळे एसएलआरचा दर आता २१.५ टक्क्यांवर आला आहे. आधी हा दर २२ टक्के इतका होता. एसएलआरच्या दरात अर्ध्या टक्क्याने कपात करण्यात आल्यामुळे बँकिंग व्यवस्थेत ३९ हजार कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे.
आरबीआयने रिझर्व्ह रेपो दरही ७.७५ टक्केच कायम ठेवला आहे. शिवाय, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआरचा दरदेखील ४ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल न केल्यामुळे गृह तसेच वाहन कर्जाच्या हप्त्यांवर कोणताही बदल होणार नाही.
एसएलआर म्हणजे काय
बँकांना काही रक्कम सरकारी रोख्यांमध्ये गुंतविणे अनिवार्य असते. या टक्केवारीला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो अर्थातच एसएलआर असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने हे गुणोत्तर आज मंगळवारी अर्ध्या टक्क्याने कमी करून २१.५० टक्क्यांवर आणले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20307

Posted by on Feb 4 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2121 of 2453 articles)


=मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [३ फेब्रुवारी] - राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचे मोठे नुकसान ...

×