Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » व्हॉटस ऍपच्या ‘नौ दो ग्यारह’ ग्रुपपासून सावध

व्हॉटस ऍपच्या ‘नौ दो ग्यारह’ ग्रुपपासून सावध

=दहशतवाद्यांनी फेकले सोशल नेटवर्किंगवर जाळे=
web-crime social mediaनवी दिल्ली, [९ जानेवारी] – दहशतवाद्यांनी ‘नौ दो ग्यारह’ नावाने व्हॉटस्‌अप ग्रुप बनवला असून आता सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जाळे फेकले आहे. तरुणांच्या चर्चेतील लोकप्रिय विषयांचा वापर करून ग्रुप बनवायचा आणि त्यात एकामागोमाग एक भारतीय तरुणांना ऍड करत जायचे, असे नवे छुपे तंत्र दहशतवादी संघटनांच्या सायबर तज्ज्ञांनी वापरायला सुरुवात केली आहे.
विशेषत: उत्तर भारतात पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सीमेजवळच्या भागातील भारतीय तरुणांना या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. या ग्रुपवरून ओळख करून एकमेकांशी साध्या विषयावर गप्पा मारायच्या आणि नंतर हलकेच त्यांना दिशाभूल करणारी माहिती द्यायची. या माहितीमुळे भारतीय तरुण स्वत:च्याच देशाविरुद्ध कसे भडकतील, यादृष्टीने खोटे मेसेजेस शेअर करत राहायचे, हा या दहशतवाद्यांचा छुपा उद्योग आहे. या मेसेजेसला भुलून भारतीय तरुणांनी स्वत:हूनच देशातील व्यवस्थेविरोधात हिंसक कारवाई करण्यासाठी उद्युक्त व्हावे, अशी मानसिकता तयारी केली जात आहे.
जाळ्यात फसलेल्या तरुणांना विशिष्ट ठिकाणी भेटावयास बोलावून दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी देशाबाहेर नेले जात आहे. या माध्यमातून दंगली घडवण्याचाही त्यांचा हेतू आहे, असे भारतीय सायबर तज्ज्ञांनी स्पष्ट केले असून सध्या हे तज्ज्ञ या संकटाचा सामना करण्यास सरसावले आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेलीमधील दोन युवकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. ‘नौ दो ग्यारह’ या ग्रुपमध्ये बरेलीतील काही युवकांना आपोआपच ऍड केले गेले. त्यानंतर ग्रुप ऍडमिनने त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती आणि दोन फोटो मागितले. ग्रुपविषयी शंका आल्याने हे दोघेजण ग्रुपमधून बाहेर पडले. तरीही पुन्हा काही दिवसांनी त्याच ग्रुपमध्ये किंवा दुसर्‍या नावाने सुरू असलेल्या पाकच्या व्हॉटस् ऍप ग्रुपमध्ये ऍड केले जात असल्याची तक्रार या दोघांनी केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26466

Posted by on Jan 11 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (927 of 2453 articles)


=पठाणकोट वायुसेनेच्या तळाला पंतप्रधानांची भेट= पठाणकोट, [९ जानेवारी] - पंजाबच्या पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या तळावर गेल्या शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ...

×