Home » क्रीडा, ठळक बातम्या » शकिराच्या तालावर थिरकले फुटबॉलप्रेमी

शकिराच्या तालावर थिरकले फुटबॉलप्रेमी

  • २०१४ च्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेचा नयनरम्य समारोप
  • मर्केल, पुतीन यांची उपस्थिती

रियो दी जानेरियो, [१३ जुलै] – गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या फुटबॉलच्या महाकुंभाचा आज एका नयनरम्य सोहळ्याने समारोप झाला. यावेळी २०१८ च्या विश्‍वचषक स्पर्धेचा यजमान देश असलेल्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मर्केल आणि ब्राझीलच्या अध्यक्ष राउसेफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोलंबियन पॉप स्टार शकिराने सलग तिसर्‍या विश्‍वचषक स्पर्धेत आपली नृत्यकला सादर केली आणि २०१४ च्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेचे अधिकृत गीत सादर केले. यावेळी शकिराने मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांसह जगभरातील लाखो चाहत्यांना आपल्या तालावर ठेका धरायला भार पाडले. शकिराने ला…ला…ला हे गाणे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. बार्सिलोनाचा प्रख्यात फुटबॉलपटू गेरार्ड पीके याची पत्नी असलेल्या शकिराने नृत्य सादर केल्यानंतर मिलान पिके मेबारक या आपल्या लहान मुलासह पुन्हा व्यासपीठावर हजेरी लावताच उपस्थित प्रेक्षकांनी तिचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेदरम्यान शकिराचे वाका…वाका हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.
शकिराच्या नृत्यानंतर मेक्सिकोचा गिटार वादक कार्लोस सांताना, ब्राझीलियन गायक इव्हेटी सांगालो आणि सांबा स्कूलच्या कलाकारांनी पुन्हा स्टेडियममधील उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. सामना सुरू होण्यापूर्वी बार्सिलोनाचा माजी कर्णधार कार्लेस प्युओल आणि ब्राझीलची मॉडेल गिसेले बंडचेन यांनी सोन्याचा झळाळता विश्‍वचषक मैदानात आणला. स्टेडियमच्या आत आणि बाहेर कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी तब्बल २६ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभात पिटबुल, जेनिफर लोपेझ आणि क्लॉडिया लेईट्टी यांनी आपली कला सादर केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14145

Posted by on Jul 14 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2399 of 2455 articles)


=मणिपुरात क्रीडा विश्‍वविद्यापीठ : जेटली= नवी दिल्ली, [१० जुलै] - केन्द्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात क्रीडेकडे विशेष ...

×