Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शनी शिंगणापूरवरील साडेसाती संपली

शनी शिंगणापूरवरील साडेसाती संपली

  • चौथर्‍यावर येऊन पूजा करण्यावर बंदी
  • महिला पुजार्‍याचीही नियुक्ती करणार
  • श्री श्री रविशंकर यांची माहिती

Sri-Sri-Ravi-Shankar-in-Berlinनवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना पूजा करण्याची परवानगी मिळावी, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आज रविवारी आध्यात्मिक धर्मगुरू श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळे काही प्रमाणात मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढे शनी मंदिराच्या चौथर्‍यावर येऊन पुरुष किंवा महिला पूजा करू शकणार नाही. केवळ पुजारीच चौथर्‍यात प्रवेश करू शकणार आहेत. दरम्यान, महिला पुजार्‍याची नियुक्ती करण्याचाही निर्णय झाला आहे.
श्री श्री रविशंकर आणि भूमाता ब्रिगेडच्या सदस्यांमध्ये आज राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून उद्‌भवलेला वाद सुटल्याचा दावा रविशंकर यांनी केला. तर भूमाता ब्रिगेडने चर्चा पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे जाहीर केले. ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई म्हणाल्या की, महिलांना मंदिराच्या चौथर्‍यावर प्रवेशाची परवानगी मिळावी, अशी आमची मागणी आहे. ती मान्य न करता, पुरुष आणि महिला दोघांनाही चौथर्‍यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही चर्चा पूर्णपणे यशस्वी झाली, असे कदापि म्हणता येणार नाही. तिथेच, पत्रकारांशी बोलताना श्री श्री म्हणाले की, पुरुष असो वा महिला दोघांनाही चौथर्‍याच्या बाहेर राहूनच शनी देवाची पूजा करता येणार आहे. शनी देवावर तेलही मशीनच्या माध्यमातूनच टाकण्यात येईल. तथापि, ११ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतर चौथर्‍यावर प्रवेश करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. शनी देवावर मोठ्या प्रमाणात तेल टाकण्यात येत असल्याने चौथरा तेलकट झाला असून, अनेक भाविक त्यावर चालताना घसरून जखमी झाले आहेत. या घटना लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
या व्यवस्थेवर सर्वांमध्येच एकमत झाले आहे. आता कुठलेही मतभेद राहिले नाही. स्त्री-पुरुष हा भेदच आम्ही मिटविला आहे. आता सर्वांना बाहेरूनच पूजा करण्याची परवानगी मिळणार आहे, असे सांगताना ते म्हणाले की, या मंदिरात महिला पुजार्‍याची नियुक्ती करण्यावर आमच्यात एकमत झाले आहे. पण, जोपर्यंत महिला पुजारी पूर्णपणे प्रशिक्षण घेत नाही, तोपर्यंत त्यांनाही चौथर्‍यावर येता येणार नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26769

Posted by on Feb 8 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (848 of 2451 articles)


=न्यूयॉर्क टाईम्सचे खळबळजनक वृत्त= न्यूयॉर्क, [७ फेब्रुवारी] - आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींमागे केवळ पाकिस्तानच असून, या देशाची शक्तिशाली गुप्तचर संस्था आयएसआय ...

×