Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » शरीफांनी गठित केले संयुक्त तपास पथक

शरीफांनी गठित केले संयुक्त तपास पथक

=पठाणकोट हल्ला, आयएसआय, लष्करी अधिकार्‍यांचा समावेश=
Pakistan Prime Minister Nawaz Sharifइस्लामाबाद, [११ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुदलाच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमधील दहशतवादी गटांशी संबंध आहे काय, याची चौकशी करण्यासाठी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज सोमवारी संयुक्त तपास पथक गठित केले. तथापि, या पथकाने काही तासांतच भारताने दिलेले मोबाईल क्रमांक आमच्या देशातील नसल्याचा दावा करून ते फेटाळून लावले आहेत.
विशेष म्हणजे, पठाणकोट हल्लेखोरांना मदत करणार्‍या आयएसआय आणि लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा या पथकात समावेश असल्याने निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
पठाणकोट येथील हल्ल्याचा कट पाकमध्येच तयार झाला आणि याच देशातील दहशतवादी गट असलेल्या जैश-ए-मोहम्मदने हा कट तडीस नेला, याबाबतचे ठोस पुरावे भारताने पाक सरकारला सोपविल्यानंतर, शरीफ यांनी संयुक्त तपास पथक स्थापन केले. या पथकाने लगेच तपासाला सुरुवात केली आणि भारताने दिलेले दोन्ही मोबाईल क्रमांक पाकचे नसल्याचा अहवाल सरकारला सादर केला. येत्या १५ जानेवारीला भारत आणि पाकमधील विदेश सचिवांमधील चर्चेचे भवितव्यही पाकच्या कारवाईवरच अवलंबून असताना, या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. यानंतर संयुक्त तपास पथक गठित करण्यात आला. यात आयबी, आयएसआय आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, पठाणकोट हल्लेखोरांना आयबी, आयएसआय आणि लष्कराचेही समर्थन असल्याचे पुरावे भारताने दिले असल्याने, या तपास पथकाच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अनेकांची धरपकड
भारताने दिलेले पुरावे आणि मोबाईल क्रमांकांच्या आधारावर कारवाई करताना पाकच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी शेकडो संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुजरानवाला, बहावलपूर आणि झेलम या जिल्ह्यांमध्ये व्यापक धाडी घातल्या आणि या संशयितांना अटक केली. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत असली, तरी अद्याप कुठलेही धागेदोरे पोलिसांना मिळाले नाही, अशी माहिती सूत्राने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26475

Posted by on Jan 12 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (929 of 2458 articles)


नवी दिल्ली, [११ जानेवारी] - फ्लिपकार्ट या आघाडीच्या ऑनलाईन खरेदी-विक्री कंपनीने सीईओपदी बिनी बन्सल यांची नियुक्ती केली आहे. बन्सल यापूर्वी ...

×