Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » शशी थरूरांना कन्हैयात दिसला भगतसिंह!

शशी थरूरांना कन्हैयात दिसला भगतसिंह!

=कॉंगे्रसमध्ये पडले एकाकी, भाजपाचीही टीका=
shashi-tharoor-kanhaiya-kumarनवी दिल्ली, [२१ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे समर्थन करण्याची स्पर्धाच कॉंगे्रस पक्षात सुरू झाली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी कन्हैयाची पाठराखण केली असताना, शशी थरूर यांनी तर त्याही पुढे जात देशद्रोहाचा आरोपी असलेल्या कन्हैयाची तुलना चक्क भगतसिंग यांच्याशी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळे ते स्वकियांसोबतच भाजपाच्याही प्रखर टीकेचे लक्ष्य ठरले आहेत.
रविवारी सायंकाळी या विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना थरूर यांना कन्हैयाची स्तूती करण्याचा मोह आवरला नाही. भारत हा फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान एवढ्यापुरताच मर्यादित नाही. भारत हा कृष्ण आणि कन्हैया कुमार यांचाही देश आहे. कन्हैयात तर मला भगतसिंग यांचेच गुण दिसत आहेत. आजच्या काळातील तो भगतसिंगच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
आम्हाला कृष्णासोबतच कन्हैया कुमारचाही भारत हवा आहे. जिथे सर्वांना समान अधिकार असतील. मात्र सध्या केवळ ‘भारत माता की जय’ या एकाच घोषणेवरून राष्ट्रभक्तीची परिभाषा निश्‍चित केली जात आहे. भारतीय राज्य घटनेत ज्याप्रमाणे व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तसाच व्यक्त न होण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे कोणी कुणावर श्रद्धा ठेवावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे आणि आपला निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच असायला हवा. भारत माता की जय म्हणण्यासाठी कुणावरही बळजबरी करण्यात येऊ नये, असेही त्यांनी सांगून टाकले.
कॉंगे्रस, भाजपाची टीका
शशी थरूर यांच्या या वक्तव्यावर कॉंगे्रस आणि भाजपाने सडकून टीका केली आहे. कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी थरूर यांच्या मतावर तीव्र नाराजी व्यक्त करताना, भगतसिंग यांच्यासारखा दुसरा कुणीच असू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबतही तुलना केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. आझाद यांच्या या भूमिकेमुळे थरूर आपल्याच पक्षात आता एकाकी पडले आहेत. भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही थरूर यांना धारेवर धरले. देशाला तोडण्याची भाषा बोलणारे लोक भगतसिंग असूच शकत नाही. थरूर यांनी कन्हैयाची तुलना भगतसिंगांशी करून, भारत मातेच्या या थोर सुपुत्राचा अपमान केला आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27508

Posted by on Mar 22 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (596 of 2453 articles)


मुंबई, [२१ मार्च] - जगातील प्रसिद्ध मेसेजिंग वेबसाईट टि्‌वटरचा आज दहावा वाढदिवस आहे. ‘टि्‌वटर’च्या दशकपूर्तीनिमित्त आज लाखो युझर्सनी शुभेच्छा दिल्या ...

×