Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » शस्त्र दलालांच्या इशार्‍यावरूनच माझ्यावर हल्ला

शस्त्र दलालांच्या इशार्‍यावरूनच माझ्यावर हल्ला

=जनरल व्ही. के. सिंह यांचा गंभीर आरोप=
vk_singhनवी दिल्ली, [१२ एप्रिल] – शस्त्रास्त्र दलालांच्या इशार्‍यावर काम करणारा मीडियाचा एक समूह आपली बदनामी करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत आपण कल्पना दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शस्त्रास्त्र दलालांच्या इशार्‍यानुसारच माझ्या बदनामीचे कटकारस्थान रचले जात आहे. मी लष्करप्रमुख असताना प्रभाव कमी करण्यात त्यांना यश आले नाही. मात्र, अजूनही रात्रंदिवस त्यांचे हे प्रयत्न सुरूच आहेत. लष्करातील एक माजी वरिष्ठ अधिकारीदेखील या कटकारस्थानाचा भाग आहे, असा आरोपही जन. व्ही. के. सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला. वेगवेगळ्या लोकांशी त्या व्यक्तीचे कसे संबंध आहेत याबाबत मी फार काही बोलणार नाही. मात्र, त्याच्याकडून पैसा घेणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे काही पत्रकार आणि इतर लोक, ते जसे सांगतात तसे लिखाण आणि वार्तांकन करतात, असाही आरोप जन. सिंह यांनी केला.
गेल्या २३ मार्च रोजी नवी दिल्लीस्थित पाकिस्तानी दूतावासाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला हजेरी लावल्यामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना जन. सिंह बोलत होते. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात आयोजित कार्यक्रमाला हजेरी आणि येमेनमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेची तुलना करतानाही जन. सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन हे लोक सक्रिय होते. वेगवेगळ्या लोकांनी किती पैसा घेतला याची आपल्याला कल्पना आहे आणि हे लोक अजूनही सक्रिय आहेत. काहीही करून मला बाहेर काढणे, हेच त्यांचे एकमेव लक्ष्य आहे, असाही आरोप जन. सिंह यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21978

Posted by on Apr 13 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1802 of 2453 articles)


=वरिष्ठ मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा= नवी दिल्ली, [१२ एप्रिल] - सध्या परदेश दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीत ...

×