Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » शहीद जवानांची चेष्टा थांबवा

शहीद जवानांची चेष्टा थांबवा

=शिवसेनेचा ‘देशी गुलामां’ना इशारा=
saamna sampadakiyaमुंबई, [९ ऑक्टोबर] – एकीकडे पाकप्रशिक्षित अतिरेक्यांशी लढा देताना आपल्या जवानांना वीरमरण येत आहे आणि दुसरीकडे याच पाकिस्तानमधील कलावंतांना आपले भारतीय आयोजक संगीत आणि अन्य प्रकारच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत असतात. हा प्रकार शहीद जवानांचा अपमानच आहे. पाकची घुसखोरी केवळ सीमेपुरतीच मर्यादित राहिली नाही, ती देशाच्या अन्य भागांमध्येही वाढली आहे. ती थांबवायलाच हवी, असा स्पष्ट इशारा शिवसेनेने आज शुक्रवारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधील अग्रलेखातून दिला आहे.
पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्रात विरोध केल्यानंतर काही काही लोक देशात इतरत्र त्यांच्या कार्यक्रमाचे समर्थन करीत आहेत. या देशी गुलामांनी वेळीच सावध व्हावे, असे अग्रलेखात नमूद आहे.
कला व कलावंतांना आमचा मुळीच विरोध नाही. पण, भारतद्वेषासाठी दहशतवादी कारवायांचे नेहमीच समर्थन करीत आलेल्या देशाला आमचा विरोध आहे. गुलाम अलीच्या निमित्ताने शहीदांचा अपमान का करता, काही पाकपुरस्कृत मानवतावाद्यांनी आपली बेसूर नरडी उघडली आहेच, पण आम्ही जे केले ते केले. आम्ही आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. गेल्या महिनाभरात पाककडून ५० वेळा संघर्षविरामाचे उल्लघन करण्यात आले, नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर असंख्यवेळा गोळीबार झाला. दोन महिन्यांत २० जवान शहीद झालेत. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. पाकव्याप्त काश्मिरातील हिंदू नरकयातना भोगत आहेत. हे सर्व सुरू असताना पाकिस्तानी गजल गायकांचे रेशमी गजल सूर ज्यांना प्रिय वाटत आहेत, त्यांना शहीदांच्या कुटुंबीयांचे हुंदके व आक्रोश ऐकायला घराघरात न्यायला हवे, अशा शब्दात शिवसेनेने ‘देशी गुलामां’ना चिमटे काढले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25067

Posted by on Oct 10 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1355 of 2452 articles)


=इसिसचे ११ तळ उद्ध्वस्त= मॉस्को, [८ ऑक्टोबर] - रशियाच्या लढाऊ नौकांनी क्रूज मिसाइलद्वारे सीरीयामधील इसिस दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला आहे. ...

×