Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » शांतता, समानतेसाठी भारत कटिबद्ध : राष्ट्रपती

शांतता, समानतेसाठी भारत कटिबद्ध : राष्ट्रपती

pranab_president_ptiनवी दिल्ली, [४ मार्च] – देशाला प्रभावी शक्ती संतुलन आणि सक्षम संरक्षण दलाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले असून, शांतता आणि समानतेसाठी भारत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
११९ हेलिकॉप्टर युनिटला प्रेसिडंंट स्टॅण्डर्ड आणि भारतीय वायुसेनेच्या २८ इक्विपमेंट डेपोला प्रेसिडंट्‌स कलर्स प्रदान करण्यासाठी वायुसेनेच्या येथील तळावर शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते. ११९ हेलिकॉप्टर युनिटमध्ये एमआय-१७ व्ही-५ या अत्याधुनिक हेलिकॉप्टरचा समावेश आहे. ‘द स्टॅलियन्स’ या नावानेही हे युनिट ओळखले जाते.
सर्वसमावेशक विकासासह नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी देश जोमाने प्रयत्न करत आहे. मात्र, यासोबतच आमचे सार्वभौमत्त्व आणि प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यावरही आमचे लक्ष आहे. कोणत्याही आपात परिस्थितीचा सामना करण्यासह हिताचे रक्षण करण्यासाठी देश सज्ज असल्याचा विश्‍वास आमच्या सशस्त्र दलांमुळे निर्माण झाला आहे, असेही राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले.
आज माझ्यासमोर बसलेले वायुसैनिक सर्वोच्च स्तराचा सेवा बाणा दाखवून आपली जबाबदारी पार पाडण्यास कटिबद्ध आहेत. देशाचे आकाश आणि सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय वायुसेना अतिशय उत्तमपणे पार पाडत आहे, असे मुखर्जी यांनी सांगितले. भारतीय वायुसेना आणि निस्वार्थीपणे बलिदान करणार्‍या जवानांचा देशाला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्‌गारही राष्ट्रपतींनी यावेळी काढले.
अनेक नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भारतीय वायुसेनेने हाती घेतलेल्या बचाव मोहिमा चिरकाळ आमच्या स्मरणात राहतील. अशा प्रकारच्या मोहिमा हेच वायुसेनेच्या जवानांची निष्ठा आणि मनोधैर्याचे प्रतीक आहेत, असेही मुखर्जी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27011

Posted by on Mar 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (772 of 2453 articles)


नवी दिल्ली, [४ मार्च] - कृषी उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता देशाला नव्या हरित क्रांतीची गरज आहे, असे मत महिंद्रा ...

×