Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » शाही इमामांचा ‘आप’ला समर्थनाचा फतवा

शाही इमामांचा ‘आप’ला समर्थनाचा फतवा

SHAHI_IMAM_BUKHARIनवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – जातीयवादी शक्तींपासून मुस्लिमांना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे सांगत, जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी दिल्लीतील मुस्लिमांनी केवळ आम आदमी पार्टीलाच मतदान करावे, असा फतवा जारी केला आहे. तथापि, आपने बुखारींचा पाठिंबा घेण्यास नकार दिला.
दिल्लीत प्रामाणिक आणि धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेवर यावे आणि त्यासाठी मुस्लिमांना मोठी भूमिका पार पाडायची आहे. समाजाचे विभाजन करणार्‍या शक्तींनाच भाजपाने आपला पाठिंबा दिला असल्याने दिल्लीतील मुस्लिमांनी या पक्षाला मतदान करू नये. केवळ आपलाच मतदान करावे, असे बुखारी यांनी आज शुक्रवारी जारी केलेल्या फतव्यात म्हटले आहे. देशाला जातीयवादाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान मुस्लिमांचेच होणार आहे, असेही त्यांनी यात नमूद केले आहे.
दरम्यान, आपचे नेते संजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्हाला जाती-धर्मावर आधारित राजकारण करायचे नाही. त्यामुळे आम्ही बुखारी यांनी देऊ केलेला पाठिंबा नाकारत आहोत. बुखारी यांची विचारधारा आम्हाला मुळीच मान्य नाही. आम्हाला धार्मिक पाठिंबा नको. देशवासीयांचा पाठिंबा हवा आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20357

Posted by on Feb 7 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2106 of 2452 articles)


नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] - मराठी साहित्यातील कलाकृतींना परखड भाषेची जोड देऊन साहित्य क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे ख्यातनाम ...

×