Home » ठळक बातम्या, सोलापूर » शिंदे म्हणाले, अनामत वाचली, हेच नशीब!

शिंदे म्हणाले, अनामत वाचली, हेच नशीब!

सोलापूर, (२७ मे) – ‘मी हरणार याची मला पूर्वकल्पना होती कारण माझ्याच पक्षाचे लोक माझ्या विरोधात काम करीत होते. पण माझं नशीब चांगलं की अनामत जप्त झाली नाही,’ अशी कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सोलापुरात बोलताना दिली. आपल्या परंपरागत मतदारसंघात झालेल्या दारूण पराभवाचे खापर त्यांनी पक्षाच्या लोकांवरच फोडले. ‘आपल्या लोकांकडून दगा होणार याची कल्पना आली होती. म्हणूनच निवडणुकीच्या आधीपासून मी सोलापुरात ठाण मांडून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. पण शेवटी जे व्हायचं तेच झालं,’ असे निराशाजनक उद्‌गार शिंदे यांनी काढले.
‘खरं तर मला राजकारणातून निवृत्ती घ्यायची होती. पण पक्षाने आदेश दिल्याने निवडणूक लढविली. माझा पराभव हा जनादेश आहे आणि मीच तो स्वीकारायला हवा. पक्षाच्या पराभवासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र जबाबदार नाहीत,’ असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले. यानंतर आपण राजकारण करणार नसून, पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13332

Posted by on May 27 2014. Filed under ठळक बातम्या, सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, सोलापूर (2424 of 2453 articles)


=केंद्र सरकारचा निर्णय, मुलांचे शैक्षणिक भत्तेही वाढले= नवी दिल्ली, (७ मे) - आपल्या कर्मचार्‍यांना अंशत: ‘गिफ्ट’ देताना केंद्र सरकारने आज ...

×