Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या मंजुरीबाबत लवकरच निर्णय : तावडे

शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या मंजुरीबाबत लवकरच निर्णय : तावडे

vinod-tawde2मुंबई, [२२ मार्च] – शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पदांच्या मंजुरीबाबत लवकरच शासन निर्णय घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधाबाबतचा तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. त्याला तावडे उत्तर देत होते.
२३ ऑक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या सुधारित आकृतिबंधाबाबत फेरविचार करण्याकरिता आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्यात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या संदर्भात चर्चा सुरू असून या संदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खाजगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतीबंध येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा विचार सरकार करत असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा बुक बँक योजना
रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बुक बँक योजना पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. रात्रशाळांच्या संदर्भातील तारांकित प्रश्‍न ना. गो. गाणार, अनिल सोले, रामनाथ मोते यांनी उपस्थित केला.
राज्यात जवळपास १७६ रात्रशाळा असून, त्यामध्ये १४,५५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवसभर काम करूनही शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर रात्र शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुक्त शाळांचा विचार शासन करत आहेत, असेही तावडे यांनी नमूद केले.
त्याचप्रमाणे या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक मिळावेत, यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे तावडे यांनी पुढे सांगितले.
ना. गो. गाणार यांच्या मूळ प्रश्‍नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, राज्यातील रात्रशाळांना पूर्णवेळ दर्जा देण्याबाबत २००७ मध्ये सरकारने समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला. मात्र, दरम्यानच्या काळात शिक्षण हक्क कायदा राज्यामध्ये लागू झाल्यानंतर समितीने सादर केलेल्या आपल्या अहवालातील शिफारशींची व्याख्या बदलली गेली. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याला अनुसरून काही बाबी नव्याने विचार केला जाईल, असे तावडे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27550

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (580 of 2451 articles)


मुंबई, [२२ मार्च] - शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला ...

×