Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न

=शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आवाहन=
vinod-tawde2मुंबई, [१५ जून] – प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. त्यामुळेच शालेय शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केले.
नवीन शैक्षणिक वर्षातील आजचा पहिला दिवस होता. विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा यासाठी स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी तावडे यांनी मंत्रालय ते लॉर्ड हॅरिस महानगर पालिका शाळेपर्यंतचा प्रवास शालेय बसमधून विद्यार्थ्यांबरोबर केला. या प्रवासादरम्यान तावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, फुगे तर दिलेच पण विद्यार्थ्यांना आपण शाळेत असताना करीत असलेल्या गंमती जंमतीही सांगितल्या. यानंतर तावडे यांनी आज धोबीतलाव येथील लॉर्ड हॅरिस महानगर पालिका उच्च माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेला भेट दिली आणि विद्यार्थांचे स्वागत करून तेथील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नही विचारले. शाळेत अभ्यास करायला आवडतो का? शाळेत यायचा कंटाळा आला का? शाळेत शिकवलेले समजते का? शाळेची वेळ योग्य वाटते का? असे विविध प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. यानंतर विद्यार्थ्यांबरोबर काही कविताही तावडे यांनी म्हटल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणारे शैक्षणिक साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28617

Posted by on Jun 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (229 of 2451 articles)


मुंबई, [१५ जून] - वृक्ष लागवडीसाठी राज्यात सकारात्मक वातावरण तयार झाले असून या ऊर्जेतून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हरित करणार असल्याचे ...

×