Home » ठळक बातम्या, म.प्रदेश, राज्य » शिवराजसिंह चौहान यांना बडतर्फ करा

शिवराजसिंह चौहान यांना बडतर्फ करा

=कॉंग्रेसची मागणी=
congress logoनवी दिल्ली, [६ जुलै] – मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळातील (व्यापमं) घोटाळ्याशी कथित संबंध असलेल्या ४५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, याप्रकरणी शिवराजसिंह चौहान यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी आज सोमवारी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना या ४५ जणांच्या मृत्यूची जबाबदारी टाळता येणार नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ बडतर्फ करून व्यापमं घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सोमवारी येथे एका पत्रपरिषदेत बोलताना केली. सूरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला केला आणि पंतप्रधानांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यासह या घडामोडींची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी मागणी केली.
व्यापमं घोटाळ्याप्रकरणी यानंतर एकही अनैसर्गिक मृत्यू होण्यापूर्वी राज्य सरकारने याच्या सीबीआय चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी केली. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास होत आहे म्हणजे तो निष्पक्ष आहे, असा त्याचा अर्थ नाही. सरतेशेवटी जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनाच स्वीकारावी लागेल, असे जिचदम्बरम् यांनी ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर म्हटले आहे.
प्रशिक्षणार्थी महिलेचा मृत्यू
भोपाळ: व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या माध्यमातून पोलिस निरीक्षकाची नोकरी प्राप्त झालेल्या महिलेचा मृतदेह तलावात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. अनामिका सिकरवार असे २५ वर्षीय प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक महिलेचे नाव असून, तिचा मृतदेह सागर जिल्हा मुख्यालयतील पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळच्या तलावात आढळून आला. मात्र, महिलेच्या मृत्यूचा व्यापमं घोटाळ्याशी काहीही संबंध नसून, कौटुंबिक कारणामुळे तिने आत्महत्या केली आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, प्रत्येक मृत्यूचा व्यापमं घोटाळ्याशी संबंध जोडणे अयोग्य असल्याचे मत शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23279

Posted by on Jul 7 2015. Filed under ठळक बातम्या, म.प्रदेश, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, म.प्रदेश, राज्य (1578 of 2452 articles)


पंतप्रधानांचा विश्‍वास ‘डिजिटल इंडिया’चा शुभारंभ रक्तरहित सायबर युद्धाचा जगाला धोका नवी दिल्ली, [१ जुलै] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

×