Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शिवरायांचा इतिहास शाळांमध्ये शिकविणार: तावडे

शिवरायांचा इतिहास शाळांमध्ये शिकविणार: तावडे

=मराठी भाषा बंधनकारक=
vinod-tawde3मुंबई, [११ मार्च] – केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आय.जी.सी.एस.ई. व आय.बी.या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी महाराजांचा इतिहास या शाळांमध्ये शिकविण्यात येणार असून, त्यासाठी विधिमंडळ सदस्यांचा ठराव या अधिवेशनात घेण्यात येईल व तो केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळांमधील नर्सरी प्रवेशासाठी शासनाने धोरण आखण्याबाबतचा प्रश्‍न विधानसभेत ऍड. यशोमती ठाकूर, अमिन पटेल, अस्लम शेख आदी सदस्यांनी प्रश्‍नोेत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये आय.सी.एस.ई, सी.बी.एस.ई., आय.जी.सी.एस.ई., आय. बी. या केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळा असल्या तरीही या शाळांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त चार ओळींचा आहे. शिवाजी राजे यांचा उल्लेेख नाही. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा इतिहास शिकविला गेला पाहिजे. या शाळांना राज्याच्या शिक्षण विभागातर्फे दर तीन वर्षांनी एन.ओ.सी. घ्यायची आवश्यकता असते. यापुढे या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देताना या शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा बंधनकारक करण्यात येईल तसेच महाराष्ट्राचा इतिहास या विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टीने या शाळांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा इतिहास शिकविण्यात येईल. शिवाजी महाराजांचा इतिहास या विद्यार्थ्यांना शिकविला गेला पाहिजे यासाठी आम्ही तशी अट या शाळांना ना हरकत प्रमाणपत्र देताना नमूद करणार आहोत असेही तावडे यांनी सांगितले.
मुंबई शहर व उपनगरातील नर्सरीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विविध नर्सरी चालकांकडून भरमसाट फी आकारली जात आहे. पालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. परंतु, पूर्व प्राथमिक शिक्षण हे शासनाच्या थेट नियंत्रणाखाली नाही. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी यासंदर्भात एक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून हा अहवाल विचाराधीन असल्याचे तावडे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील शहरांपासून ते ग्रामीण आदिवासी, भटक्या विमुक्तांंचे पाडे, स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्या या ठिकाणी ‘लेक शिकवा अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. ३ ते २६ जानेवारी दरम्यान हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये आढळून आलेल्या मुलामुलींना शाळेमध्ये दाखल करून घेतले असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणले आहे. या मुलांच्या शिक्षणावर सरकारने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रश्‍नोेत्तराच्या तासात दिली.
राज्यात लेक शिकवा अभियानाकडे होत असलेले दुर्लक्ष या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण, अमिन पटेल आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने तसेच मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी यासाठी लेक शिकवा या अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असेही तावडे यांनी सांगितले.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ही केंद्र सरकारच्या निधीअंतर्गत चालविण्यात येत होती, परंतु सध्या ही योजना बंद आहे. तरीही महाराष्ट्रात वेगळया पद्धतीने ही योजना राबविण्यात येण्याबाबत विचार करण्यात येईल असे तावडे यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27238

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (690 of 2451 articles)


=मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा= मुंबई, [११ मार्च] - विवाहाआधीच आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे सुशिक्षित ...

×