Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » शिवसेनाप्रमुख दहशतवादी, मोदी मनोरुग्ण

शिवसेनाप्रमुख दहशतवादी, मोदी मनोरुग्ण

=मुशर्रफांनी उधळली मुक्ताफळे=
pervez-musharrafइस्लामाबाद, [२८ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मिरात पाकिस्तानचेच दहशतवादी आहेत आणि लष्कर-ए-तोयबा आमचीच निर्मिती आहे, अशी जाहीर कबुली दिल्यानंतर पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे दहशतवादी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मनोरुग्ण आहेत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत.
पाकमधील ‘दुनिया’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना मुशर्रफ यांनी आपल्या अकलेचे दिवाळे काढणारे अजब तर्कट मांडले आहे. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतही अपशब्द काढले आहेत. रा. स्व. संघ आणि शिवसेना भारत-पाक यांच्यातील क्रिकेट संबंधांना विरोध करीत आहेत. शिवसेनेने तर गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. तसेच पाकचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांचा मुंबईतील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमही उधळून लावला. हा सर्व प्रकार संघाच्या इशार्‍यावर सुरू आहे, असे मुशर्रफ यांनी या मुलाखतीत सांगितले.
भारतात बॉम्बस्फोट घडविणारे आणि मुंबईवर हल्ला करणारा लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद आणि झकीऊर रहमान लखवी यासारखे दहशतवादी पाकसाठी स्वातंत्र्यसैनिक कसे ठरू शकतात, असा प्रश्‍न मुलाखतकाराने मुशर्रफ यांना विचारला असता, मुशर्रफ यांनी या प्रश्‍नावरील उत्तर टाळताना, थेट बाळासाहेब ठाकरे हेच खरे दहशतवादी होते, असा शोध लावला.
रा. स्व. संघ आणि शिवसेनेने भारत-पाक क्रिकेट संबंध सुरळीत होण्यात आडकाठी आणली व पीसीबी आणि बीसीसीआयमधील बैठक उधळून लावली, पाकी गजल गायक गुलाम अलीचा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले, कसुरींच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रोखला. यासाठी संघ व शिवसेनेच्या नेत्यांना कुणी अटक केली का, असा सवाल करीत हाफिझ आणि लखवीबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.
मुशर्रफ एवढ्यावरच थांबले नाही, तर समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात भारतीय कर्नल राज पुरोहित यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबाबत बोलायचे सोडून भारत हाफिझबाबत बोलत असतो. भारताने आधी पुरोहित यांना पाकच्या स्वाधीन करावे आणि नंतर हाफिझबाबत बोलावे, असा अफलातून युक्तिवादही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25398

Posted by on Oct 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1261 of 2458 articles)


=अजित डोभाल यांचा इशारा= नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] - दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि त्या माध्यमातून भारताविरोधात छुपे युद्ध पुकारणे यामुळे ...

×