Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » शेअर बाजारात काळा पैसा येण्याची शक्यता

शेअर बाजारात काळा पैसा येण्याची शक्यता

=विदेशी व्यवहारांवर ‘रॉ’ची नजर=
RAW - research and analysis wingनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – भारतीय शेअर बाजारात काळा पैसा येण्याची शक्यता असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर संशयास्पद वाटणार्‍या विदेशी व्यवहारांवर बारीक नजर ठेवण्याची सूचना केंद्र सरकारने रिसर्च ऍण्ड ऍनलेसिस विंग अर्थात ‘रॉ’ला केली आहे.
आर्थिक गुप्तचर परिषदेशी संबंधित कार्यदलाच्या अलीकडेच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्राने दिली.
थेट विदेशी गुंतवणुकीवरील सविस्तर माहिती आर्थिक गुप्तचर संस्थेला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट सचिवांनी सादर केल्यानंतर या दिशेने हालचालींना वेग आला. व्यापाराला चालना देण्यासोबतच, देशात व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावरही सरकारने भर दिला असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26514

Posted by on Jan 14 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (913 of 2453 articles)


=प्रीमियम कमी होणार, आधुनिक तंत्रज्ञानाने होणार नुकसानीची पाहणी= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - कुठे अतिशय कमी पाऊस, तर कुठे अतिवृष्टी ...

×