Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

Sharad Joshi1मुंबई, [१२ डिसेंबर] – शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी झटणारे, शेतकर्‍यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये संस्थापक नेते व माजी खासदार शरद जोशी यांचे आज शनिवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी आज सकाळी ९ वाजता अखेरचा श्‍वास घेतला.
शरद जोशी यांच्या निधनामुळं शेतकरी चळवळचा ‘ पंचप्राण’ हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचे निधन झाले. शरद जोशी यांच्यावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
३ सप्टेंबर १९३५ रोजी सातारा येथे जन्म झालेल्या शरद जोशी यांची शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लढणारे झुंझार नेते अशी ओळख होती. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी शेतकर्‍यांचा आर्थिक विकास व्हावा, त्यांना हक्क मिळावा यासाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना दखल घ्यायला वारंवार भाग पाडले होते. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. या काळातही ते शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करत राहिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26147

Posted by on Dec 12 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1026 of 2451 articles)


=डेव्हिड हेडलीचा खुलासा= नवी दिल्ली, [११ डिसेंबर] - गुजरातच्या अहमदाबादजवळ पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहॉं ही तरुणी पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाचीच ...

×