Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीवर भर देणे आवश्यक – नितीन गडकरी

शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीवर भर देणे आवश्यक – नितीन गडकरी

nitin-gadkari11मुंबई, [१ जुलै] – बदलत्या हवामानामुळे येणार्‍या काळात शेतीसमोर मोठी आव्हाने उभी राहणार आहेत. तेव्हा शेतकर्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार न करता आव्हान स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञान, जलशिवार, तसेच सेंद्रिय खतांवर भर देऊन आत्मविश्‍वासाने शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी येथे केले.
कृषिदिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित शेती व शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणार्‍या ‘कृषिरत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी बोलत होते.यावेळी केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कृषी राज्यमंत्री राम शिंदे, आ. अनिल गोटे, आ. आरायण पाटील, आ. रमेश शेंडगे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन वेळूकर, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीवर आधारित नव-नवीन प्रयोग केले पाहिजेत. ज्या उत्पादनाची कमतरता आहे, त्या उत्पादनाची लागवड केली पाहिजे. उत्पादन खर्च कमी करणे, चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्याचे सूत्र अमलात आणणे. देशी गाईंचे शेण, गांडूळखत यासारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज भासणार नाही, शिवाय उत्पादनाची गुणवत्ताही वाढेल.
शेतकर्‍यांनी पारंपरिक शेती बरोबरच इथेनॉल, बायोडिझेल, बायो सीएनजी निर्मितीतही उतरावे. असे झाल्यास शेतकरी स्वत:ची वीज तयार करू शकतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आयात करण्याची गरज पडणार नाही. माध्यमांनी अशा यशस्वी शेतकर्‍यांच्या कथा समाजासमोर मांडल्यास इतर शेतकर्‍यांनाही नवीन प्रयोग करायला आत्मविश्‍वास मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, आधुनिक खतांचा वापर करताना लाभाचा विचार केला जात असून, खतांचे भाव वाढणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार कराडच्या डॉ. शिवाजी ठोंबरे यांना प्रदान करण्यात आला. तर २९ शेतकर्‍यांना कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जपानचे शेतकरी युसिको यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23225

Posted by on Jul 2 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1580 of 2451 articles)


=सुप्रीम कोर्टाने फेटाळली आव्हान याचिका= नवी दिल्ली, [१ जुलै] - संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला केंद्र किंवा राज्य ...

×