Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतीविषयक कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस

शेतीविषयक कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती=
devendra-fadnavis7मुंबई, [४ एप्रिल] – राज्य सरकारच्या नव्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना गुणवत्ता असलेले कौशल्य पुरवून रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या विभागांतर्गत शेतीविषयक आवश्यक ते कौशल्य देण्यासाठी चीनच्या धर्तीवर राज्य सरकार चाचपणी करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी दिली.
कौशल्य विभागाच्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडण्यात आल्या होत्या. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सदर माहिती दिली. जगात विविध उद्योगांना त्या त्या उद्योगाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशात तरुणांची संख्या पाहता राज्यात ५० टक्के तरुण असून, यात २५ वयोगटातील तरुणांची मोठी संख्या आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विभागाची स्थापना केली. त्यामुळे त्या त्या उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण रोजगार देण्यासाठी राज्यात या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून विविध कंपन्या लाखो तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार देणार असल्याचे मुख्यंमंत्र्यांनी सभागृहात दिली. चीनमध्ये शेतीविषयक कौशल्य दिल्यानंतर त्यांच्या शेती व्यवसायात मोठ्याप्रमाणात भर पडली. हा अनुभव पाहता राज्य सरकारही शेतीविषयक आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्या संदर्भात चाचपणीही करण्यात येत आहे. यांनतर राज्यातील तरुणांना योग्य ते शेतीविषयक कौशल्य प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात असलेले सेवा क्षेत्रात मोठ्याप्रमाणात रोजगारांच्या संधी आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य तरुणांना नाही. उद्योगांची ही मागणी पाहता आणि राज्यातील बेरोजगारांची संख्या पाहता सरकारने राज्यात ७ लाखापेक्षा अधिक कंपन्या आणि संस्थांशी करार केला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच राज्यात होणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
टाटा कंपनी, महिंद्रा टेक यांच्यासह विविध नामांकित कंपन्या यासाठी पुढाकार घेत असून, पारंपारिक कौशल्यधारक उमेदवारांना सक्षम करून त्यांना त्यासंदर्भातील प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था सरकार करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राज्यसरकारच्या कार्यालयातही आवश्यक असे कौशल्य विकास प्रशिक्षण राबवू शकतो का? यावर विचार सुरू असून, याठिकाणी काय प्रशिक्षण देऊ शकतो याचाही विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27717

Posted by on Apr 5 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (523 of 2451 articles)


मुंबई, [५ एप्रिल] - रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण आज जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेने आज मंगळवारी जाहीर ...

×