Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » शैलजा यांच्या आरोपावर जेटली यांचा पलटवार

शैलजा यांच्या आरोपावर जेटली यांचा पलटवार

=राज्यसभेत गदारोळ, कामकाज सहा वेळा स्थगित=
Arun Jaitley3नवी दिल्ली, [२ डिसेंबर] – माजी केंद्रीय मंत्री शैलजा यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या टिपण्णीमुळे राज्यसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. या मुद्यावरून सभागृहाचे कामकाज सहा वेळा स्थगित करावे लागले.
गुजरातच्या एका मंदिरात आपण गेलो असता आपल्याला आपली जात विचारण्यात आली, आपल्याशी भेदभाव करण्यात आला, असा आरोप शैलजा यांनी सोमवारी संविधानावरील चर्चेदरम्यान केला होता. त्या मुद्याचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. आज सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती आपण घेतली, फेब्रुवारी २०१३ मध्ये शैलजा या मंदिरात गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी मंदिराच्या व्हिजिटर बुकमध्ये मंदिराबाबत अतिशय चांगला शेरा लिहिला, त्यांना जर मंदिरात चुकीची वागणूक मिळाली असती, तर त्यांनी चांगला शेरा लिहिला नसता, असे जेटली म्हणाले. या घटनेची तक्रारही त्यांनी आजपर्यत कुठे कधी केली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर शैलजा उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की, माझा आरोप द्वारकेच्या मुख्य मंदिराबाबत नव्हता. या मंदिरात मला चांगली वागणूक मिळाली, माझा आक्षेप दुसर्‍या मंदिराबाबत होता, तसा खुलासाही मी सोमवारीच केला होता. जेटली सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप शैलजा यांनी केला. जेटली यांच्या या विधानामुळे कॉंग्रेसचे सदस्य संतप्त झाले आणि घोषणा देत वेलमध्ये आले. सभागृहात प्रचंड गोंधळाचे वताावरण निर्माण झाले होते, सभागृहात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न उपसभापती कुरियन करत होतेे, पण त्याला यश येत नव्हते. यातच ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या टिपण्णीमुळे कॉंग्रेस सदस्यांच्या संतापाचा भडका उडाला. सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्यासाठी वारंवार कृत्रिम समस्या निर्माण केल्या जातात, असा आरोप गोयल यांनी केला. जेटली आणि गोयल यांनी आपले विधान मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सदस्य करत होतेे. त्यामुळे आधी सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
दुपारी २ वाजता कामकाज सुरू होताच कॉंग्रेसचे सदस्य पुन्हा घोषणा देत वेलमध्ये आले. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातही घोषणा सुरू झाल्या. सभागृहात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न उपसभापती कुरियन वारंवार करत होते, पण कॉंग्रेस सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. कुरियन यांनाही ते बोलू देत नव्हते, त्यामुळे ते चांगलेच भडकले. या मुद्यावर आपण तोडगा काढू कारण आपल्याला तामीळनाडूतील पूरपरिस्थितीवर चर्चा करायची आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या दालनात बसून आपण या मुद्यावर चर्चा करू, असे कुरियन यांनी म्हणताच तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी त्यावर आक्षेप घेतला. हा मुद्दा सभागृहातच निकालात काढावा, अशी मागणी त्यांनी केली. माकपचे सीताराम येचुरीही बोलायला उभे ठाकले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसची भूमिकाही स्पष्ट केली. शेवटी या मुद्यावर कुरियन यांच्या दालनात तोडगा काढण्यावर एकमत झाले. त्यासाठी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. तोडगा निघत नसल्यामुळे आणखी तीन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. पण सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होत नव्हते. शेवटी उद्या सकाळी सभापतींच्या दालनात या मुद्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सभागृहात तामीळनाडूतील पूरपरिस्थितीवर चर्चा सुरू झाली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25936

Posted by on Dec 3 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1098 of 2453 articles)


=४५ अब्ज रुपये दान करणार= सॅनफ्रॅन्सिस्को, [२ डिसेंबर] - फेसबुक या जगातील आघाडीच्या सोशल नेटवर्किंग साईटचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना ...

×