Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » श्रीकर परदेशी यांनी नाकारला ९० हजारांचा बोनस

श्रीकर परदेशी यांनी नाकारला ९० हजारांचा बोनस

Acting managing director of Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) Shrikar Pardeshi for the first time will be directly interacting with the bus passengers today to understand their problems and to improve the service at IMDR on Sunday- Anuj Aniruddha Rajandekar dna

Acting managing director of Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) Shrikar Pardeshi for the first time will be directly interacting with the bus passengers today to understand their problems and to improve the service at IMDR on Sunday- Anuj Aniruddha Rajandekar dna

पिंपरी-चिंचवड, [२१ नोव्हेंबर] – सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेले आणि पारदर्शी व स्वच्छ कारभारासाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी यांनी, दिवाळीसाठी दिला जाणारा तब्बल ९० हजार रुपयांचा बोनस पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला विनम्रपणे परत केला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्रीकर परदेशी यांची आतापर्यंतची कारकीर्द पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण म्हणूनच लोकांच्या स्मरणात राहिली आहे. पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून श्रीकर परदेसी यांनी २३ मे २०१२ रोजी सूत्रे हाती घेतली होती. पण, राजकीय दबावात त्यांची १० फेब्रुवारी २०१४ रोजी बदली करण्यात आली. या १८ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करताना, पारदर्शक कारभाराचे उत्तम उदाहरण समोर ठेवले होते. त्यांच्या याच पारदर्शक व्यवहाराची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त केले. तिथेही त्यांनी केलेल्या कामामुळे अल्पावधीतच त्यांना संचालक पदावर बढती देण्यात आली.
पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असताना, सरकारी नियमाप्रमाणे त्यांना १८ महिन्यांच्या कामासाठी महानगर पालिकेने ९० हजार रुपयांचा बोनस धनादेशाद्वारे पाठविला. पण, त्यांनी तो नम्रपणे नाकारला. केंद्रीय प्रशासकीय सेवेत असल्याचा संकेत पाळत त्यांनी हा बोनस नाकारला असल्याची माहिती सूत्राने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25612

Posted by on Nov 22 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (1192 of 2451 articles)


=विनय बिद्रे राष्ट्रीय महामंत्री= मुंबई, [१९ नोव्हेंबर] - युवकांमध्ये राष्ट्रभक्ती व चारित्र्याची जोपासना करणार्‍या आणि देशातील अग्रणी विद्यार्थी संघटना असलेल्या ...

×