श्रीमंतांसाठी काम करते मोदी सरकार: राहुल गांधी
Thursday, October 8th, 2015शेखपुरा (बिहार), [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार केवळ श्रीमंतांसाठीच काम करीत असून, गरीब आणि दुर्बल लोक मात्र संकटात आहेत, असा आरोप कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बुधवारी केला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासनेही मोदी सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. बिहारच्या शेखपुरा येथे आयोजित एका निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना ते बोलत होते.
राहुल गांधी पुढे म्हणाले, दीड वर्षापूर्वी नरेंद्र मोदी निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी मोदींची जी आश्वासने दिली होती, त्या सर्व आश्वासनांशी तुम्ही परिचित आहात. त्यांनी अनेक आश्वासने दिली होती. ज्यात काळापैसा परत आणणे आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणे, युवकांना रोजगार आणि शेतकर्यांच्या कृषिमालाच्या हमीभावात वाढ इत्यादी आश्वासनांचा समावेश होता. मात्र, त्यांनी ही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींनी केवळ आपल्या कॉर्पोरेट मित्रांना पाठिंबा दिला आहे. पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश सारख्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर पंतप्रधान शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याऐवजी मौन बाळगून आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान वारंवार विदेश दौरे करतात. मात्र, त्यांनी कधीही शेतकरी किंवा बेरोजगारांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत जदयु, राजद आणि कॉंग्रेस महाआघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आम्ही आपल्यासोबत राहू आणि आपल्यासाठी लढू, असेही त्यांनी सांगितले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25023

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!