Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » श्रीश्री रविशंकर यांना इसिसची धमकी

श्रीश्री रविशंकर यांना इसिसची धमकी

=मलेशियन पोलिस करताहेत तपास=
shri shri ravishankarक्वालालम्पूर, [३० मार्च] – गेल्या आठवड्यात मलेशियातील पेनांग इथे योग महोत्सवासाठी गेलेले प्रख्यात आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्रीश्री रविशंकर यांना इसिस या जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या कथित धमकीप्रकरणी मलेशियन पोलिस तपास करीत आहेत.
श्रीश्री ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते त्याच्या व्यवस्थापकाच्या नावे हे पत्र असून, त्यावर इसिसचा झेंडा आणि शिर कापलेल्या एका माणसाचे चित्र आहे. मलेशियामध्ये रविशंकर यांना हिंदू धार्मिक विधी करण्याची परवानगी दिल्यास तुमचे हॉटेल नष्ट करू, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून रविशंकर इराण आणि इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचे धर्मपरिवर्तन करीत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. धमकीचे हे पत्र स्थानिक टपालातूनच पाठविण्यात आले आहे. हे पत्र नेमके कुठून आले याचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती पेनांगमधील पोलिस अधिकारी खालिद अबु बकर यांनी दिली आहे. मुस्लिमबहुल लोकसंख्येच्या मलेशियात केवळ आठ टक्के भारतीय असून, त्यापैकी बहुतांश लोक हिंदू आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21844

Posted by on Mar 31 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1830 of 2458 articles)


=खळबळजनक खुलाशामुळे आपच्या अडचणी वाढल्या= नवी दिल्ली, [३० मार्च] - आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव ...

×