Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » संख्येने कमी असतानाही पारशी संतुष्ट

संख्येने कमी असतानाही पारशी संतुष्ट

=अरुण जेटलींची प्रशंसा=
Arun Jaitley10नवी दिल्ली, [१९ मार्च] – भारतातील सर्वांत लहान समुदाय असलेल्या पारशी समाजाने आजवर कधीही स्वत:ला अल्पसंख्यक म्हणवले नाही. आनंदी आणि समाधानी राहण्याच्या त्यांच्या आदर्श विचारधारेमुळेच हे शक्य झाले आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पारशी समाजाची प्रशंसा केली.
अल्पसंख्यक व्यवहार आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पारशी लोक उदारमतवादी आणि मोठ्या मनाचे असून, आजवर त्यांनी विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. मला वाटते की, भारतातील सर्वांत लहान अल्पसंख्यक असलेल्या या समुदायाने आजवर कधीही स्वत:ला अल्पसंख्यक म्हणवले नाही, ही कौतुकाची बाब आहे. असे करून या समाजाने नवा आदर्श निर्माण केला आहे, असे जेटली म्हणाले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इराणहून पारशी लोक भारतात आले. मात्र त्यानंतरही त्यांनी आपली संस्कृती जपली आणि प्रत्येक क्षेत्रात ते आघाडीवर राहिले. गुजरातमधील उद्वदा गावात पारशी शतकांपूर्वीच स्थिरावले. त्यानंतर त्यांनी या गावाला जागतिक सांस्कृतिक केंद्रामध्ये परिवर्तीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या गावाचा विकास करण्याकरिता पुढाकार घेतला.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला, महेश शर्मा आणि मुख्तार अब्बास नकवी व पारशी समुदायातील मान्यवर तसेच ब्रिटिश खासदार करण बिलीमोरिया उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27458

Posted by on Mar 20 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (613 of 2453 articles)


=गुजरात हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा= अहमदाबाद, [१९ मार्च] - मुलगा १८ वर्षांचा पूर्ण होईपर्यंतच त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आई-वडिलांवर असते, असा महत्त्वपूर्ण ...

×