Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

Aadesh-Shrivastavaमुंबई, [५ सप्टेंबर] – प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचेकाल शुक्रवारी मध्यरात्री कर्करोगाने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन रूग्णालयात रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
आदेश श्रीवास्तव यांना २०१० साली रक्ताचा कर्करोग झाल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यावर योग्य ते उपचार सुरू केले. गेल्या चाळीस दिवसांपासून त्यांच्यावर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांना त्यांची प्रकृ ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावरील केमोथेरीपीचे उपचारही थांबवले होते. अखेर काल शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
आदेश यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘बागबान, कभी खुशी कभी गम, चलते – चलते आणि राजनीती सारख्या प्रसिद्ध चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.
त्यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथे अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23707

Posted by on Sep 6 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1502 of 2452 articles)


=सरकारच्या कामकाजाची समीक्षा झाली नाही= नवी दिल्ली, [४ सप्टेंबर] - मोदी सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असून समाधानकारक आहे. त्यामुळे ...

×