Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » संघाच्या शिबिरावर हल्ल्याची सीमीची योजना होती

संघाच्या शिबिरावर हल्ल्याची सीमीची योजना होती

=दिल्ली पोलिसांची माहिती=
terroristनवी दिल्ली, [२१ मार्च] – देशात कायद्याने बंदी असलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेच्या चार सदस्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील शिबिरावर मोठा हल्ला करण्याची योजना आखली होती, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगर येथे २०१३ मध्ये झालेल्या जातीय दंगलीचा सूड उगविण्यासाठी संघाच्या शिबिरावर हल्ला करण्यात येणार होता. ही योजना तडीस नेण्यासाठी सिमीचे चार सदस्य मध्यप्रदेशच्या खांडवा येथील मध्यवर्ती तुरुंगातून फरार झाले होते; मात्र सुरक्षा संस्था व पोलिसांनी या चौघांनाही अटक करण्यात यश मिळविले. यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता, ही धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
अमजद खान, झाकीर हुसेन, मेहबूब गुड्डू आणि सालिक अशी सिमीच्या या अतिरेक्यांची नावे आहेत. या चौघांनी अल् कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेच्या इन्स्पायर या मासिकामधून सिलेंडर बॉम्ब तयार करण्याचे तंत्र अवगत केले होते. संघाच्या शिबिरात या बॉम्बचा स्फोट करण्याची योजना आखण्यात आली होती. पण, या बॉम्बमध्ये ऐन वेळी बिघाड झाला आणि त्याचा अतिरेकी राहात असलेल्या घरामध्येच स्फोट झाला. या अतिरेक्यांनी एक वर्षासाठी उत्तर प्रदेशातील बिज्नौर येथे एक घर भाड्याने घेतले होते, असे हा अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27511

Posted by on Mar 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (595 of 2453 articles)


=कॉंगे्रसमध्ये पडले एकाकी, भाजपाचीही टीका= नवी दिल्ली, [२१ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे समर्थन करण्याची स्पर्धाच ...

×