Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » संजय दत्तची येरवड्यात रवानगी

संजय दत्तची येरवड्यात रवानगी

=‘फर्लो’ला मुदतवाढ नाकारली=
Sanjay-Dutt-812मुंबई, [१० जानेवारी] – डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संचित रजा अर्थातच ‘फर्लो’वर बाहेर आलेला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्त याने रजा वाढविण्यासाठी केलेला अर्ज पुण्याच्या येरवडा तुरुंगातील प्रशासनाने फेटाळून लावला. यानंतर लगेच शरण जाण्यासाठी संजय दत्त मुंबईहून पुण्याला रवाना झाला. सायंकाळी त्याला पुन्हा कारागृहात डांबण्यात आले.
संजुबाच्या संचित रजेचा कालावधी शुक्रवारी संपला होता. त्यानुसार तो येरवड्याच्या परिसरातही गेला होता. पण, मुदत वाढविणार्‍या अर्जावर निर्णय घेण्याच्या मुद्यावर कारागृह प्रशासन आणि मुंबई पोलिसांत समन्वय न झाल्याने तो पुन्हा मुंबईकडे फिरला. आज सकाळी त्याच्या वकिलाने रजा वाढविण्यास प्रशासनाने नकार दिला असल्याचे फोनवरून कळविले आणि हादरलेला संजय दत्त दुपारनंतर पुण्याकडे निघाला. सायंकाळी तो येरवड्यात आल्यानंतर पुन्हा आपल्या बरॅकमध्ये पोहोचला.
संजय दत्तने आरोग्याचे कारण पुढे करून संचित रजेचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. तथापि, पुण्यातही वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने संजय दत्तने तत्काळ शरण यावे, असा आदेश येरवडा प्रशासनाने दिला होता.
कायदा सर्वांसाठी सारखाच : मुख्यमंत्री
दरम्यान, संजय दत्तवर राज्यातील भाजपा सरकार मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप होत असताना, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. संजय दत्तला मिळालेली रजा ही नियम आणि कायद्यानुसारच आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. यात भाजपा सरकार भेदभाव करणार नाही, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19534

Posted by on Jan 11 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2264 of 2452 articles)


=तीन पैकी कोणतीही एक निःशुल्क= नवी दिल्ली, [१० जानेवारी] - पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी ...

×