Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » संजय दत्त २७ फेब्रुवारीला कायमचा सुटणार

संजय दत्त २७ फेब्रुवारीला कायमचा सुटणार

Sanjay-Dutt-812मुंबई, [६ जानेवारी] – मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारागृहात असलेला आरोपी संजय दत्तचे कारागृहातील वर्तन चांगले असल्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी सुटणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय दत्तला दोषी ठरविल्यानंतर १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात त्याची रवानगी झाली होती. त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजय दत्तने आधीच भोगली होती. त्यामुळे साडेतीन वर्ष त्याला शिक्षा भोगायची होती. सध्या तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे ११६ दिवस आधी म्हणजे साडेतीन महिनेआधीच कारागृहातून सुटणार आहे. त्यानुसार २७ फेबु्रवारीला संजय दत्तची सुटका होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी संजय दत्तच्या सुटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून गेल्या वर्षीच्या जानेवारी सुट्‌या संपूनही उशिरा कारागृहात गेल्याबद्दल संजय दत्तवर दंडही आकारला गेला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26435

Posted by on Jan 6 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (934 of 2452 articles)


=अरुण जेटली यांची कोर्टात माहिती= नवी दिल्ली, [५ जानेवारी] - दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) माझ्या कारकीर्दीत एका पैशाचाही ...

×