Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » संपुआचा आणखी एक घोटाळा उघडकीस

संपुआचा आणखी एक घोटाळा उघडकीस

=जेट खरेदीत लाच दिल्याचा आरोप, डीआरडीओ मागणार स्पष्टीकरण=
jet-plainनवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – इटलीसोबतच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्याचे भूत अजूनही कॉंगे्रसच्या मानगुटीवर बसले असतानाच, आता कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारच्याच काळातील जेट खरेदी व्यवहारातील कथित घोटाळ्याने त्यात नवी भर घातली आहे. ब्राझीलच्या एम्ब्राअर या विमाननिर्मिती कंपनीसोबत जेट विमाने खरेदी करण्याकरिता केलेल्या सुमारे २०८ दशलक्ष डॉलर्सच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात लाच देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२००८ मधील हा जेट खरेदी व्यवहार आहे. एम्ब्राअर कंपनीने आतापर्यंत अनेक कंत्राटं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच दिली आहे. यातील अनेक प्रकरणं अमेरिकन तपास संस्थांच्या रडारवर आहेत. भारताला जेट देण्याच्या व्यवहारातही लाच दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याने भारतीय संरक्षण संशोधन संस्था अर्थात डीआरडीओने या प्रकरणी एम्ब्राडर कंपनीकडून स्पष्टीकरण मागण्याचे ठरविले आहे. या स्पष्टीकरणानंतर चौकशीची पुढील दिशा निश्‍चित केली जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
संपुआ सरकारच्या काळातील या घोटाळ्याचा काही वृत्तपत्रांनी पर्दाफाश केला आहे. एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल सिस्टिमकरिता स्वदेशी रडारसह सज्ज असलेली तीन जेट विमाने खरेदी करण्याच्या करारावर एम्ब्राअर आणि डीआरडीओ यांच्यात स्वाक्षरी झाली होती. २०१० मध्ये डॉमिनिकन प्रजासत्ताकसोबत या कंपनीने केलेला करार संशयास्पद असल्याचे अमेरिकन तपास अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर कंपनीने आजवर केलेले सर्वच करार चौकशीच्या कक्षेत आले. या कंपनीने आठ देशांसोबत मोठमोठे करार केले असून, यात भारताचाही समावेश असल्याचे चौकशीत दिसून आले आहे.
ब्राझीलच्या या कंपनीचे सौदी अरब आणि भारतासोबत चांगले संबंध असल्याने या कंपनीने अन्य देशांसोबतचे कंत्राटं आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी लाच दिली आहे का, या दिशेने अमेरिकेच्या विधि खात्याने तपास सुरू केला आहे. ब्रिटनमधील काही भारतीय उद्योगपतींनी हा सौदा पक्का करण्यासाठी या कंपनीकडून लाच स्वीकारली असल्याचा अमेरिकेला संशय आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29274

Posted by on Sep 11 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (99 of 2453 articles)


टोकियो, [१० सप्टेंबर] - नेताजी सुभाषचंद बोस मेमोरिअल इंडो-जपान या संस्थेच्यावतीने जपानमधील निक्को शहरात नेताजींच्या स्मरणार्थ सुसज्ज स्मारक बांधण्यात येणार ...

×