Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » संयुक्त राष्ट्राला दहशतवाद समजलेला नाही : मोदी

संयुक्त राष्ट्राला दहशतवाद समजलेला नाही : मोदी

India's PM Modi reacts during a meeting with Brazil's President Rousseff on the sidelines of the 6th BRICS summit at the Alvorada Palace in Brasiliaब्रसेल्स, [३१ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बेल्जियमच्या दौर्‍यावर आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी दहशतवादाच्या मुद्यावरून संयुक्त राष्ट्रावर टीका केली. दहशतवादाची व्याख्याच संयुक्त राष्ट्रांना माहिती नाही हे दुर्देव आहे. ब्रसेल्समध्ये गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता.
दहशतवादाचा धोका आज संपूर्ण जगाला आहे. दहशतवाद संपूर्ण मानवजातीसाठी धोका आहे, ज्यांचा मानवतेवर विश्‍वास आहे त्यांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला पाहिजे. दहशतवादाला कोणत्याही धर्मांशी जोडू नका. दहशतवादाचा प्रश्‍न गांभीर्याने घेतला पाहिजे, ज्या देशांमधून दहशतवादाला समर्थन मिळतं आणि त्याला खतपाणी घातलं जातंय त्या देशांवर संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मोदींनी केली.
दहशतवादाला शस्त्रांनी संपवता येणार नाही. मात्र कोणताही तरूण दहशतवादाकडे वळणार नाही याची खबरदारी घ्यावी. यासाठी समाजात बंधुभावाचं वातावरण निर्माण करावं लागेल, असेही मोदींनी स्पष्ट केलं. जगाला आता दहशतवादाचे परिणाम दिसत आहेत. मात्र भारत मागच्या ४० वर्षांपासून दहशतवादाने त्रस्त आहे. असेही मोदींनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27655

Posted by on Mar 31 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (547 of 2458 articles)


नवी दिल्ली, [३० मार्च] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स जाळण्यात किंवा नष्ट करण्यात आल्या, यावरून देशातील राजकीय वातावरण ...

×