Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » संरक्षण अंदाजपत्रकात भरीव वाढ

संरक्षण अंदाजपत्रकात भरीव वाढ

=चीनची घोषणा=
china-map-flagबीजिंग, [४ मार्च] – दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेसोबत सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्या संरक्षण अंदाजपत्रकात ७ ते ८ टक्क्यांची वाढ करणार असल्याची घोषणा चीनतर्फे आज शुक्रवारी करण्यात आली.
‘चीनच्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ होण्याची प्रक्रिया सुरूच राहणार. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीची वाढ कमी असेल आणि ती सात ते आठ टक्क्यांच्या आसपास असेल’, असे नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या (एनपीसी) नॅशनल लेजिस्लेचरच्या वार्षिक अधिवेशनाचे प्रवक्ते फू यिंग यांनी सांगितले. २०१० साली झालेल्या साडेसात टक्क्यांच्या वाढीनंतर चीनच्या संरक्षण अंदाजपत्रकात एक आकडी वाढ होण्याची ही पहिलीच घटना आहे. नेमकी आकडेवारी उद्या शनिवारी जारी करण्यात येणार्‍या अंदाजपत्रक अहवालात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी चीनच्या संरक्षण अंदाजपत्रकात १०.१ टक्के वाढ होऊन ते १४५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोचले होते. भारताच्या मते संरक्षणावर चीनचा होणारा खर्च तीन पट जास्त आहे.
दक्षिण चीन समुद्राच्या मुद्याला हवा देऊन आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्याचा अमेरिकन लष्कराचा प्रयत्न आहे, असेही माजी उपपरराष्ट्रमंत्री असलेल्या फू यांनी सांगितले. संरक्षण अंदाजपत्रकातील ही वाढ चीनची राष्ट्रीय सुरक्षा व महसूल लक्षात घेता करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. चीन आपली संरक्षण गरज, अर्थव्यवस्था, विकास आणि वित्तीय स्थिती लक्षात घेऊन संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करत असतो, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27004

Posted by on Mar 5 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (778 of 2458 articles)


=पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात= नवी दिल्ली, [३ मार्च] - काही लोकांचे वय वाढते, पण त्यासोबत बुद्धी वाढत नाही, अशा ...

×