Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » संरक्षण क्षेत्रातील खरेदीत सहजता असावी

संरक्षण क्षेत्रातील खरेदीत सहजता असावी

=संरक्षण मंत्री पर्रिकर यांचे मत=
manohar-parrikar2बंगळुरू, [१९ फेब्रुवारी] – संरक्षण क्षेत्रातील विद्यमान खरेदी प्रक्रिया क्लिष्ट व कठीण असून, त्यात सहजता आणण्याची आवश्यकता असल्याचे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले आहे. अशा कठीण परिस्थितीत देखील संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांचे मी कौतुक करतो, असे ते म्हणाले.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रत्येक बाबीचा कालबद्ध कार्यक्रम आवश्यक असून नुसते नियोजन करून उपयोग नाही. एखाददुसरा अपवाद वगळता सर्वच संरक्षण बाबींचा नियोजित कालबद्ध कार्यक्रम आखणे आवश्यक असल्याचे पर्रिकर यावेळी म्हणाले.
राष्ट्रीय संरक्षण समितीवरील सीआयआयचे अध्यक्ष आणि भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा एन. कल्याणी म्हणाले की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आम्ही या क्षेत्रातील बदलांबाबत ऐकत आलो आहोत. आता मात्र आम्हाला थोडे बदल आणि जास्त अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. यावर भाष्य करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, माझा या म्हणण्याला पाठिंबा आहे. आतापर्यंत या विषयावर अनेक चर्चासत्रे झाली आहेत. पर्याप्त माहिती देखील संकलित झाली आहे. ८० ते ९० टक्के समस्यांची माहिती आहे. त्यामुळे आता ठोस अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20725

Posted by on Feb 20 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2040 of 2453 articles)


संरक्षण क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात एरो इंडियाचे थाटात उद्‌घाटन बंगळुरू, [१८ फेब्रुवारी] - संरक्षण उत्पादन क्षेत्रात एका नव्या युगाची ...

×