Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » संरक्षण खरेदी धोरणात ‘मेक इन इंडिया’वर भर

संरक्षण खरेदी धोरणात ‘मेक इन इंडिया’वर भर

=मनोहर पर्रीकर यांची माहिती=
manohar-parrikar_99नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – संरक्षण आणि शस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी संरक्षण खरेदी परिषदेच्या सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्वदेशी अर्थात ‘मेक इन इंडिया’ सिद्धांतावर भर देण्यात आला. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतची माहिती आज मंगळवारी दिली.
संरक्षण खरेदी धोरण आम्ही या बैठकीत निश्‍चित केले आहे. देशाला संरक्षण सामुग्री खरेदी क्षेत्रात स्वयंसिद्ध करण्याचा आमचा निर्धार आहे. तथापि, यात धोरणात्मक भागीदारीविषयी कुठलाही उल्लेख नाही. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांची निवड करताना मार्गदर्शक तत्वे निर्धारित करण्यात आलेली आहेत, असे पर्रीकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत आम्ही हे धोरण तयार केले आहे. यात खाजगी क्षेत्राची भूमिका वाढविण्यासोबतच मध्यम आणि लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असेही पर्रीकर म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26502

Posted by on Jan 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (918 of 2453 articles)


=राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधानांचे आवाहन= रायपूर, [१२ जानेवारी] - स्वामी विवेकानंद जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी शांतता, एकता ...

×