Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदभवनात भीषण आग

संसदभवनात भीषण आग

  • वातानुकूलित विभागातील यंत्रणा जळून खाक
  • गृहमंत्रालयाने मागवला अहवाल
  • अवघ्या ३० मिनिटात स्थिती नियंत्रणात=

sansad fireनवी दिल्ली, [२२ मार्च] – भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या संसद संकुलातील वातानुकूलित विभागात आज रविवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळांसोबतच दाट धुराचे उंच लोट आकाशात उठत होते. अग्निशमन विभागाच्या पाण्याच्या दहा बंबांच्या साह्याने अवघ्या अर्ध्या तासात ही आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालायने या प्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आगीत वातानुकूलित विभागातील यंत्रणा जळून खाक झाली. दुपारी अडीचच्या सुमारास आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर काही मिनिटातच पाण्याचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीत कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नसली, तरी सयंत्रांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वातानुकूलित विभागाने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले नसल्यानेच ही आग लागली, असे दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख ए. के. शर्मा यांनी सांगितले. तर, वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे.
संसदेच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरच ही आग लागली होती. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट या मुख्य इमारतीवरूनच आकाशात उठत होते. तथापि, इमारतीचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याचा आम्ही शोध घेणार आहोत. चौकशीला आम्ही सुरुवात केली आहे, असे पोलिस उपायुक्त एम. के. मीना यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य राजकीय नेत्यांनी या दुर्घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संसदेच्या संकुलात आग लागण्याची गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. गेल्या गुरुवारी पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वारावरील वातानुकूलित वायरिंगला आग लागली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21685

Posted by on Mar 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1855 of 2453 articles)


=माध्यमांसाठी नियमावली जारी= नवी दिल्ली, [२२ मार्च] - राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून माध्यमांनी दहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये, असे ...

×