Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदीय मर्यादांचे विरोधकांकडून उल्लंघन: रुडी

संसदीय मर्यादांचे विरोधकांकडून उल्लंघन: रुडी

rajivpratap rudyनवी दिल्ली, [१३ मार्च] – विरोधी पक्ष सभागृहात संसदीय मर्यादांचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी आणि वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शुक्रवारी एका पत्रपरिषदेत केला.
अर्थमंत्री अरुण जेटली सध्या परदेश दौर्‍यावर असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र, यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. अर्थसंकल्पावरील चर्चा अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाली पाहिजे, असा विरोधकांचा आग्रह होता. त्यामुळे अर्थसंकल्पावरील चर्चा शुक्रवारी लोकसभेत सुरू होऊ शकली नाही. ही चर्चा आता सोमवारी होणार आहे.
विरोधकांच्या या भूमिकेवर राजीव प्रताप रुडी आणि प्रकाश जावडेकर यांनी तीव्र हल्ला चढवला. कोणत्याही कारणाने सभागृहात कॅबिनेट मंत्री उपस्थित नसेल, तर राज्यमंत्री त्याचा कार्यभार पाहू शकतो, चर्चेला उत्तर देऊ शकतो, असे राजीव प्रताप रुडी यांनी अनेक दाखले देत स्पष्ट केले. कौल शकधर यांच्या पुस्तकातील उताराही त्यांनी वाचून दाखवला. अर्थराज्यमंत्री राज्यसभेत अर्थसंकल्प सादर करू शकतो, तर मग त्याच्या उपस्थितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू करण्यात गैर काय आहे, असा प्रश्‍नही जावडेकर यांनी विचारला.
विशेष म्हणजे आपण परदेश दौर्‍यावर जात असल्याची माहिती जेटली यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना दिली होती आणि त्यांच्याच अनुमतीने अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सभागृहात सुरू केली जाणार होती. मात्र, विरोधकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही चर्चा सुरू होऊ शकली नाही. सभापती महाजन यांनी केलेली विनंतीही विरोधकांनी फेटाळून लावली. असे करताना त्यांचे पद आणि प्रतिष्ठेचा विचार केला नाही, असा आरोप रुडी यांनी केला. १९५८ मध्ये संसदेत अशीच परिस्थिती उद्भवली तेव्हा अर्थराज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले होते, याकडे लक्ष वेधत प्रकाश जावडेकर म्हणाले की, कॉंग्रेस आज गोंधळलेल्या स्थितीत आहे. फक्त विरोधासाठी विरोध करत आहे. त्यांच्या विरोधामागे कोणताही तर्क नाही, असेही जावडेकर म्हणाले. यावेळी भाजपा संसदीय पक्षाचे सचिव बालसुब्रमण्यम उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21419

Posted by on Mar 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1917 of 2453 articles)


=विरोधकांचा लोकसभेत गदारोळ, कामकाज स्थगित= नवी दिल्ली, [१३ मार्च] - अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीतच अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू झाली पाहिजे, अशी मागणी करून ...

×