संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून
Thursday, February 19th, 2015=सभापतींनी रविवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक=
नवी दिल्ली, [१८ फेब्रुवारी] – येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पी अधिवेशन सुरळीतपणे चालावे या दृष्टीने लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या या पहिल्याच अर्थसंकल्पी अधिवेशनाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असून, गेल्या अधिवेशनानंतर काढलेल्या सहा वटहुकूमांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला सभागृहाची मान्यता हवी आहे. अर्थसंकल्पी अधिवेशन सुरळीतपणे चालावे यादृष्टीने सभापती महाजन यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २२ फेब्रुवारीला सर्वपक्षीय नेत्यांसाठी रात्रिभोज आयोजित केले आहे, असे संसदेच्या सूत्राने सांगितले. अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ८ मे पर्यंत चालणार आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात सत्तेवर आलेले मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे.
या अधिवेशन काळात सरकार सहा वटहुकूमांचे कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये कोळसा, खाण व खनिज, ई-रिक्षा, नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती, भूसंपादन आणि विमा क्षेत्रातील एफडीआयला परवानगी देणार्या वटहुकूमाचा समवेश आहे. विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि कोळसा खाणीच्या लिलावाबाबतची नवी यंत्रणा तयार नसल्यामुळे या दोन अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करण्यावर सरकारचा विशेष भर असेल. या अधिवेशनात काळात व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट, द राईट्स टु सर्व्हिसेस आणि ग्रिव्हासेंेस रिड्रेस विधेयक, आंतरराज्य पाणी तंटा कायद्यातील दुरुस्ती, द कॅरिएज बाय एअर (दुरुस्ती) विधेयक, द रेगन्शिन ऑफ न्यू सिस्टिम्स ऑफ मेडिसिन बिल, राष्ट्रीय महिला आयोग कायद्यात दुरुस्ती आणि आंध्रप्रदेश पुनर्रचना (दुसरी दुरुस्ती) विधेयक सादर करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सूत्राने सांगितले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=20679

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!